गव्हाची आणि भाताची शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी हाती आली आहे. गहू आणि भात पेरणीसाठी एक मशीन तयार करण्यात आली असून या यंत्राच्या मदतीने गव्हाची आणि भाताची पेरणी करता येणार आहे. या यंत्रा द्वारे शास्त्रीय पद्धतीने या पिकांची पेरणी केली जाते. धानची पेरणी करताना रोपांमधील अंतर ८ सेंटीमीटर आणि एक सरीचे अंतर २० सेटींमीटर असणे आवश्यक असते.
परंतु अनेक असे गव्हाची शेती करणारे शेतकरी आहेत जे गव्हाची पेरणी गव्हाचे बियाणे फेकून करत असतात. यामुळे पेरणी व्यवस्थीत होत नाही. यामुळे बियाण्यांमधील अतंर आणि बियाणे किती खोलवर गेले त्याची माहिती मिळत नसते. यामुळेवर पिकांच्या उत्पन्नावर मोठा परिणाम होत असतो. यामुले काही शास्त्रज्ञांनी एक यंत्र बनवलं आहे, जे तुम्ही तुमच्या शेतात सहजपणे चालवू शकतात. हे यंत्र कोणी डिझाइन केले आहे, ते कसे कार्य करते आणि या मशीनद्वारे खर्च आणि उत्पन्नामध्ये किती फरक पडतो याचीही माहिती घेऊ..
हेही वाचा : केळी उत्पादकांनो! आता केळीची शेती करण्यासाठी मोबाईल करेल मदत
डीडी किसानच्या अहवालानुसार, राजेंद्र प्रसाद कृषी केंद्रीय विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी हे यंत्र बनवलं आहे. या यंत्राच्या मदतीने तांदूळ आणि गहूचे बियाणे पेरले जातात. या यंत्राने व्यवस्थित अंतर ठेवून शास्त्रीय पद्धतीने पेरणी केली जाते. यासह पेरणी करण्याचा खर्च देखील कमी येत असतो आणि शेतातील उत्पन्न वाढत असते. दरम्यान धानची पेरणी करताना रोपांमधील अंतर ८ सेंटीमीटर आणि सरीतील अंतर २० सेंटीमीटर असणं आवश्यक असते. या गोष्टीसाठी हे मशीन खूप चांगले आहे.
यासह गहूचे बी योग्य खोली अंतरावर पुरले जाते. शिवाय सरीमध्ये पेरणी केल्याने पाणी देण्यास सोपं जात असते.या यंत्रात दोन ड्रम असतात आणि एकवेळी यात आपण ५ किलो बियाणे भरू शकतो. परंतु जाणकार फक्त तीन किलो धान्य भरण्याचा सल्ला देतात. प्रत्येक ड्रममध्ये बियाण्यासाठी २ छिद्र असतात. एकदा मशीन चालवलं तर चार सरींमध्ये पेरणी होत असते. बिया अधिक खोल पुरायच्या किंवा नाही ते आपण या यंत्राच्या साहाय्याने करू शकतो.
मजुरांचा खर्च वाचतो
हाताने पेरणी केल्यास वेळ अधिक लागत असतो. यासाठी मजूर लागतात. त्याच कामासाठी आपण यंत्राचा वापर केला तर फक्त दोन लोकांमध्ये हे काम होत असतं आणि एका दिवसात अर्धा हेक्टरपर्यंतची पेरणी होते.
अनेक प्रकारच्या जमिनीवर या यंत्राची चाचणी करण्यात आली आहे. छत्तीसगड, बिहार, मध्यप्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांसमोर याचं प्रदर्शन करण्यात आले आहे. या यंत्राच्या वापराने उत्पन्नात ५ ते २५ टक्के वाढ झाल्याचं दिसले आहे. यासह या मशीनमुळे पेरणी केल्याने पेरणी खर्चात १० हजार रुपयांची बचत झाली आहे.
Share your comments