बसिन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बॅंक लि.मध्ये अनेक पदांसाठी नोकरभरती होणार आहे. यात टायपिस्ट, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, जनरल मॅनेजर यासारख्या अनेक पदांसाठी नोकरभरती केली जाणार आहे. बॅंकिंग क्षेत्रात नोकरी करण्यात रस असलेले तरुण २३ मेपर्यत बॅंकेची अधिकृत वेबसाईट, bccb.co.in वर जाऊन अर्ज करू शकतात.
अनेक पदांसाठी मोठी भरती
बसिन कॅथलिक को-ऑपरेटिव्ह बॅंकेच्या नोटिफिकेशनमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही नोकरभरती टायपिस्ट, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, जनरल मॅनेजर या पदांव्यतिरिक्त चीफ फायनान्शियल ऑफिसर, चीफ रिस्क ऑफिसर, डेप्युटी जनरल मॅनेजर, चीफ मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर, मॅनेजर, चीफ मॅनेजर, फ्लेक्सक्युब डेव्हलपर, सिस्टम अॅडमिनिस्ट्रेटर, सपोर्ट इंजिनियर मॅनेजर, बोर्ड सेक्रेटरी आणि आक्रिकटेक्ट इत्यादी पदांसाठी ही नोकरभरती होणार आहे. विविध पदांसाठी असलेली पात्रता पुढीलप्रमाणे,
टायपिस्ट (इंग्रजी आणि मराठी)-
कोणत्याही विषयाचा पदवीधर
वय किमान ३५ वर्षे आणि पाच वर्षांचा कामाचा अनुभव
इंग्रजी आणि मराठी भाषेवर चांगली पकड
एमएस ऑफिसवर काम करण्याचा अनुभव हवा
जनरल मॅनेजर (पोर्टफोलिओ-१)
एमबीए (फायनान्स) किंवा सीए ची पदवी
एलएलबी / एलएलएम/ सीएआयआयबी ची पदवी
उमेदवाराचे वय कमाल ५० वर्षे आणि २० वर्षांचा अनुभव हवा
चीफ फायनान्शियल ऑफिसर
चार्टर्ड अकाउंटंट ची पदवी
उमेदवाराचे वय कमाल ५० वर्षे आणि २० वर्षांचा अनुभव हवा
रिस्क ऑफिसर
गणित / स्टॅटेस्टिक्स/ इकॉनॉमिक्स मध्ये पदव्युत्तर पदवी (मास्टर्स डिग्री)
एमबीए, सीए आणि सीएफए ला प्राधान्य
उमेदवाराचे वय कमाल ५० वर्षे आणि २० वर्षांचा अनुभव हवा
डेप्युटी जनरल मॅनेजर (लीगल रिकव्हरी)
वय ४५ वर्षांपेक्षा जास्त आणि किमान १५ वर्षांचा कामाचा अनुभव
एलएलबी/ एलएलएम/सीएआयआयबी ची पदवी
चीफ मॅनेजर / असिस्टंट जनरल मॅनेजर एचआर
ग्रॅज्युएट किंवा पदवीधर असण्याबरोबरच पर्सनल मॅनेजमेंट/ इंडस्ट्रियल रिलेशन/एचआर इत्यादीमध्ये डिप्लोमा
एचआर च्या कामाचा १५ ते २० वर्षांचा अनुभव
वय कमाल ५० वर्षे
मॅनेजर / चीफ मॅनेजर - ट्रेड ट्रेनी
कोणत्याही विषयाचा पदवीधर आणि आयआयबीएफ चे सर्टिफिकेशन कोर्स केलेला हवा
कमाल वय ५० वर्षे, कामाचा किमान १० वर्षांचा अनुभव
डेप्युटी मॅनेजर / मॅनेजर/ चीफ मॅनेजर - क्रेडिट
सीए/ आयसीडब्ल्यूए/ सीएस/ एमबीएम ची पदवी हवी
वय कमाल ५० वर्षे, कामाचा किमान १० ते १५ वर्षांचा अनुभव हवा
Share your comments