गुजरातमध्ये तिसरी जागतिक बटाटे परिषद

Monday, 27 January 2020 09:07 AM


गुजरातच्या गांधीनगर येथे उद्या होणाऱ्या तिसऱ्या जागतिक बटाटे परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून सहभागी होणार असून उपस्थितांना ते मार्गदर्शन करतील. 
बटाट्यांवरील संशोधन, व्यापार आणि उद्योग जगताशी त्यांचा संबंध आणि या क्षेत्रातल्या कामगिरी तसेच संधींचा आढावा पंतप्रधान घेतील. या क्षेत्राच्या प्रगतीसाठी मूल्य साखळी व्यवस्थापन विषयक आराखडाही तयार केला जाईल.

दरवर्षी 10 वर्षांनी ही परिषद होत असून यंदाची ही तिसरी परिषद आहे. या परिषदेमुळे बटाटा उद्योगाशी संबंधित सर्व हितसंबंधियांना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी मिळेल तसेच बटाट्याच्या क्षेत्रात होत असलेल्या संशोधनाचा लाभ घेता येईल.

बटाटा उत्पादनात गुजरात हे देशातले आघाडीचे राज्य आहे. गेल्या 11 वर्षात भारतातील बटाटा उत्पादन क्षेत्रात 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर गुजरातमध्ये 170 टक्क्यांची वाढ झाली आहे. गुजरातमध्ये बटाट्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली असून गेल्या दशकभरात गुजरात या उत्पादनात अव्वलस्थानी कायम आहे.

गुजरातमध्ये बटाट्यासाठी उत्तम दर्जाच्या शीतसाठा, सुविधा आणि प्रक्रिया उद्योगही आहेत. तसेच अनेक निर्यातदार देखील गुजरातमध्येच आहेत. यामुळे ही परिषद गुजरातमध्ये घेतली जात आहे. या तीन दिवसीय परिषदेत विविध कार्यक्रम, चर्चासत्र, संशोधनाविषयी कार्यक्रम आणि कृषी प्रदर्शन आयोजित केले जाईल.

potato Gujrat narendra modi बटाटा गुजरात नरेंद्र मोदी
English Summary: Third World Potato Conference in Gujarat

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णयCopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.