1. बातम्या

Rose Varieties: गुलाबाच्या या जाती देतील लाखोंचे उत्पन्न

बाराही महिने गुलाबाची बाजारात मोठी मागणी असते. प्रत्येक लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस ,सभा ,गणपती सणवार अशा अनेक कार्यक्रमासाठी गुलाबाची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते . वॅलेंटिने डे ला तर गुलाबाला उचांकी दर मिळत असतो . गुलकंद , अत्तर ,गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांची वापर होत असतो.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Rose Varieties

Rose Varieties

बाजारात बाराही महिने गुलाबाची  मोठी मागणी असते. प्रत्येक लग्नसमारंभ असो किंवा वाढदिवस ,सभा ,गणपती सणवार अशा अनेक कार्यक्रमासाठी गुलाबाची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते . वॅलेंटिने डे ला तर गुलाबाला उचांकी दर मिळत असतो . गुलकंद , अत्तर ,गुलाबजल यासाठी देखील गुलाबाच्या फुलांची वापर होत असतो. जगभरात होणाऱ्या फुलांच्या उलाढालीमध्ये एकट्या गुलाबाचा वाटा ३५ ते ४० टक्के आहे . गुलाब फुलांची शेती हा शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.                                                                                                                                                   गुलाब लागवडीसाठी जमीन कशी असावी - गुलाब लागवडीसाठी जमीन हि मध्यम स्वरूपाची असावी जेणेकरून अतिपाऊस झाला तरी पाण्याचा निचरा झाला होईल .जमिनीचा सामू हा ६ ते ७.५ असायला पाहिजे .गुलाब हे झुडूप वर्गीय असल्याने एकदा लागवड केल्यानंतर ५ ते ६ वर्ष टिकते .गुलाब हे बाराही महिने येणारे पीक आहे त्यामुळे तुम्ही केव्हाही त्याची लागवड करू शकता .पावसाच्या पाण्याच्या उपलब्धीनुसार जानेवारी -फेब्रुवारी किंवा जुने -जुलै मध्ये लागवड करू शकता.
कलमांची निवड - लागवडीसाठी स्वतः तयार केलेली कलमे निवडावीत तसेच कलमे निरोगी हव्या. निवडलेले कलम हे ४ ते ६ महिने वयाचे असावे.गुलाबाच्या २० हजारांहून जास्त जाती लागवडीखाली आहेत तरी योग्य जात निवडावी. आपल्या हवामानात आणि जमिनीत चांगली वाढणारी, आकर्षक तसेच दर्जेदार फुलांचे उत्पादन देणारी जात निवड करावी. ग्लॅडिएटर, रक्तगंधा, अर्जुन, सुपरस्टार, लेडी एक्‍स, पापा मिलन, ब्लू मून, डबल डिलाइट, पॅराडाइज, ख्रिश्‍चन डायर, ओक्‍लोहोमा, अमेरिका हेरिटेज, लॅडोस, पीस या जातींना बाजारात मोठी मागणी आहे.


जातींची विभागणी - हायब्रिड टी : लांब दांड्याच्या फुलासाठी याची लागवड करतात.एका फांदीवर १ ते ३ लांब दांड्याची फुले येतात.
या प्रकारातील फुले मोठी, आकर्षक, काही दुहेरी रंगाची असतात. यामध्ये गॅडिएटर, सुपरस्टार, डबल डिलाईट, पीस, ॲम्बेसॅडर, ब्लू मून, फस्ट प्राईज, पापा मिलन, समर सनशाईन, लॅंडोरा, डॉ. होमी भाभा या जातींचा समावेश होतो.                                                                                       बागेत लावण्यासाठी - जास्त फुले देण्याची क्षमता असलेल्या फ्लोरीबंडा, मिनिएचर व हायब्रीड टी प्रकारातील काही जातींची निवड करावी. बागेत लागवडीसाठी जोमदार वाढणाऱ्या, आकर्षक रंगाची जास्त फुले असलेल्या, जास्त काळापर्य पास्ता, कोरोना, डॅनिश गोल्ड, रॉबिनसन, ऑल गोल्ड, युरोपिआना.      सजावटीसाठी - पाकळ्यांची विशिष्ट ठेवण असलेल्या फुलांचा आकर्षक आकार, रंग व सुवास असलेल्या, पाने तजेलदार व दांडा लांब असलेल्या या जाती असतात, त्याची व्यापारी तत्त्वावर लागवडही करतात. ग्लॅडिएटर, सोनिया, रक्तगंधा, अर्जुन, डबल डिलाईट, लॅडोरा, टिकाने, सुपरस्टार, इलोनी, मर्सडिस, पापा मिलन, लेडी एक्‍स, ब्लू मून या जाती सजावटीसाठी वापरल्या जातात.
फ्लोरीबंडा : या प्रकाराची फुले मध्यम आकाराची आणि झुपक्‍यात येतात. फुले हायब्रीड टी पेक्षा ही पिके आकाराने लहान असतात.यामध्ये बंजारन, ऑल गोल्ड, चंद्रमा, डिअरेस्ट, दिल्ली प्रिन्सेस, सिटी ऑफ लखनौ, इन्डीपेन्डन्स, समर स्नो, नीलांबरी, प्रेमा, हिमांगिनी या जाती आहेत.
पॉलिएन्या : मध्यम उंचीच्या झाडाला एकेरी लहान, पसरट पण झुपक्‍याने फुले लागतात.कुंडीत, परसबागेत, कुंपणासाठी लागवड करण्यास हा प्रकार उपयोगी असतो. यामध्ये शॉवर, एको, बेबीरेड, बेबीव्हाईट, प्रीती याजाती येतात.
मिनिएचर्स : यास छोटा गुलाब असे म्हणतात. लहान झाडाची पानेही लहान असतात.याला लहान फुले झुपक्‍याने येतात. याची झाडे काटक असतात. कमी जागेत किंवा कुंड्यात लागवडीसाठी उपयुक्त.या प्रकारात पिक्‍सी, बेबी गोल्डस्टार, रोझ मरीन, किंग यलो डोल, स्वीट फेअर, ड्‌वार्फ किंग इत्यादी जाती आहेत.

 

रंगानुसार जातीचे वर्गीकरण -
लाल - ग्लॅडिएटर, ख्रिश्‍चन डायर, रक्तगंधा, रेड मास्टर पीस, ओन्ली लव्ह
गुलाबी - फ्रेंडशिप, फर्स्ट प्राईज, मारिया क्‍लास
पिवळा - लॅंडोरा, समर सनशाईन, गोल्डन टाइम्स, माबेल्ला
निळा/जांभळा - लेडी एक्‍स, ब्लू मून, पॅराडाईज
केशरी - समर हॉलिडे, सुपरस्टार, प्रिन्सेस
पांढरा - ऑनर, व्हिर्गो, जॉन एफ. केनेडी, मॅटर हार्न
दुरंगी - लव्ह, हार्टसमन
बहुरंगी - डबल डिलाईट, पीस, अभिसारिका                                                                                                                          खत व्यवस्थापन -                                                                                                                                                  गुलाबाच्या उत्तम वाढीसाठी लागवडीनंतर १५ दिवसांनी १० ग्रॅम युरिया, एक महिन्यानंतर १० ग्रॅम डी.ए.पी. आणि दोन महिन्यानंतर २ ग्रॅम मॅग्नेशियम सल्फेट द्यावे.दुसऱ्या वर्षापासून गुलाबाला हेक्‍टरी ५० टन शेणखत, १२०० किलो युरिया, २४०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि ६५० किलो सल्फेट ऑफ पोटॅश द्यावे.जून महिन्यात संपूर्ण स्फुरद, अर्धे शेणखत तसेच १/४ नत्र आणि १/४ पालाश या खताची मात्रा द्यावी. राहिले सोबत १/४ नत्र व अर्धी पालाशची मात्रा द्यावी.    पीक संरक्षण -                                                                                                                                                         भुरी, करपा, खोडकूज, पानेकूज, काळे ठिपके हे गुलाब पिकावरील प्रमुख रोग आहेत.
भुरी - भुरी रोगामुळे पानांवर बुरशीचा पांढरा थर निर्माण होवुन तो पुढे कळ्या व फुलांवर पसरतो. दिवसा जास्त तापमान व रात्री खूप थंडी तसेच धुके यामुळे रोगाचा प्रसार होतो.
करपा - गुलाबाच्या पानावर छोटे-छोटे काळे ठिपके पडतात. कालांतराने ते वाढत जाऊन पाने पिवळी पडून गळून जातात.
किडींचा प्रादुर्भाव - प्रामुख्याने लाल कोळी, पांढरी माशी, मावा, फुलकिडे, पाने खाणारी अळी, कळी पोखरणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव होतो.

English Summary: These varieties of rose will give income of millions Published on: 11 October 2023, 02:23 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters