देशात सर्वत्र मोठ्या प्रमाणात कापसाचे उत्पादन घेतले जाते. राज्यातही कापसाचे क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे. खानदेश प्रांतात सर्वात जास्त कापूस लागवड केला जातो. सध्या खरीप हंगामातील कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळत असल्याने येत्या खरिपात कापसाचे क्षेत्र वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
यामुळे आज आपण कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी घेऊन हजर झालो आहोत. आज आपण कापसाच्या दर्जेदार उत्पादन देणाऱ्या जाती विषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
RCH 134BT: कापसाचे हे वाण उच्च उत्पन्न देणारी Bt कापसाची एक वाण आहे. कापसाच्या या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे ही जात गुलाबी बोन्ड अळीस प्रतिरोधक आहे. कापसाचे हे वाण 160-165 दिवसात काढणीसाठी तयार होत असते. या जातीच्या कापसातुन प्रति एकर सरासरी 11.5 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
RCH 317BT: कापसाचे हे वाण देखील उच्च उत्पन्न देणाऱ्या Bt कापसाच्या जातीपैकी एक आहे. ही वाण ठिपकेदार अळी आणि बोन्ड अळी यांना प्रतिरोधक आहे. ही जातं देखील 160-165 दिवसात परिपक्व होते. या वाणातुन एकरी सरासरी 10.5 क्विंटल उत्पादन मिळत असते.
MRC 6301BT: कापसाची ही जातं देखील उच्च उत्पन्न देणारी Bt कापसाची जात आहे. हे ठिपकेदार सुरवंट आणि बोन्ड अळी यांना प्रतिरोधक करते. ही कापसाची जात 160-165 दिवसात काढणीसाठी तयार होत असते. या जातीपासून एकरी 10 क्विंटल उत्पादन मिळत असल्याचा दावा केला जातो.
MRC 6304BT: कापसाची ही जात देखील उच्च उत्पन्न देणारी Bt कापसाची जात आहे. ही जात देखील ठिपकेदार अळी आणि बोंड अळी यांना प्रतिरोध करत असते. ही कापसाची वाण 160-165 दिवसात काढणीसाठी तयार होत असल्याचा दावा आहे. या जातीपासून सरासरी 10.1 क्विंटल/एकर उत्पादन मिळते.
व्हाईटगोल्ड: ही कापसाची संकरीत जात कर्ल विषाणू रोगास प्रतिरोधक आहे. या कापसाच्या जातींचे पाने हिरव्या रंगाची रुंद लांबट असतात. या जातीच्या झाडांची सरासरी उंची सुमारे 125 सेमी पर्यंत असते. ही कापसाची जात 180 दिवसात काढणीसाठी तयार होतं असते. या कापसापासून 6.5 क्विंटल/एकर सरकी उत्पादीत होते.
संबंधित बातम्या:-
उन्हाळी सोयाबीन लावला खरा पण, 'या' कारणामुळे उत्पादन खर्च काढणे देखील मुश्किल
अरे कुठं नेवून ठेवलंय महावितरण! वीज जोडणी नाही तरी शेतकऱ्याला 40 हजारांची वीजबिल
Share your comments