यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत, यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, महा विकास आघाडी सरकारने सत्तेत येताच आपल्या घोषणापत्रात नमूद केल्याप्रमाणे कर्जमाफी केली, त्यावेळी ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे त्यांना प्रोत्साहनपर रक्कम देण्याची घोषणा देखील ठाकरे सरकारकडून करण्यात आली.
मात्र दोन वर्ष कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली असल्याने या प्रोत्साहनपर राशीचा विषय काही काळ काळाआड गेला. परंतु आता अर्थसंकल्पात राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री अजित दादा पवार (Ajit Dada Pawar) यांनी ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्जाची परतफेड केली आहे त्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर राशी (Government Scheme) लवकरात लवकर वितरित केली जाईल असे सांगितले.
असे असले तरी, अनेक शेतकऱ्यांच्या मनात याविषयी संभ्रमावस्था आहे. या प्रोत्साहनपर राशीसाठी कोणत्या वर्षातील नियमित कर्जफेड केलेले शेतकरी पात्र असतील? ही प्रोत्साहनपर राशी नेमकी केव्हा वितरित केली जाईल? असे नाना प्रकारचे प्रश्न शेतकरी बांधवांना पडले आहेत.
मात्र शेतकऱ्यांच्या या प्रश्नावर राज्याचे गृहमंत्री तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी पूर्णविराम लावत याविषयी बुधवारी सविस्तर कथन केले आहे. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, सन 2017-18, सन 2018-19 आणि सन 2019-20 या कालावधीत ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्जाचा लाभ घेतला असेल आणि 30 जून 2020 पर्यंत त्याची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाचं 50 हजार रुपये प्रोत्साहनपर राशी देण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त 2018-19 यावर्षी पीक कर्ज घेतले आहे पण त्याची रक्कम 50 हजाराहून कमी अद्याप बाकी आहे त्यांना देखील कर्ज एवढ्या रकमेची मदत केली जाणार आहे. मित्रांनो राज्य सरकारने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर राशी देण्यासाठी या अर्थसंकल्पात सुमारे दहा हजार कोटींची तरतूद केली आहे. तसेच या प्रोत्साहनपर राशीचा सुमारे वीस लाख शेतकऱ्यांना फायदा मिळणार असल्याचे सांगितले गेले आहे.
हेही वाचा:-मोठी बातमी! 'या' कारणामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे होणार चांगभलं; बांधावरच मिळणार खरेदीदार
हेही वाचा:-आनंदाची बातमी! आता शेतकऱ्यांना मिळणार 1 लाख 60 हजाराचे विनातारण कर्ज
Share your comments