परभणी जिल्ह्यात यावर्षी २०२१ साठी पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगामातील पिकणासाठी लागू केली आहे त्यामध्ये सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, ज्वारी व बाजरी अशी सात पिके आहेत. शेतकऱ्यांना त्यांचा विमा प्रस्ताव सादर करण्यासाठी अंतिम तारीख १५ जुलै आहे अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे यांनी दिली आहे.
पिकांच्या उत्पादनात घट:
अन्नधान्य व गळीतपिके तसेच नगदी पिकांसाठी विमा हप्ता वेगवेगळा आहे जसे की अन्नधान्य व गळीत पिकांसाठी २ टक्के विमहप्ता आहे तर नगदी पिकांसाठी ५ टक्के विमहप्ता आहे. अधिसूचित पिकांचे उत्पादन त्या हंगामातील मागील ७ वर्षांपैकी सर्वाधिक उत्पादनाच्या ५ वर्षाचे सरासरी उत्पादन गुनुले त्या पिकाचा मस्तर असणार आहे. या सर्व पिकांसाठी ७० % जोखिमस्तर करण्यात आलेला आहे.पेरणी केल्यापासून काढणी करण्यापर्यंत लागणाऱ्या कालावधीत नैसर्गिक आग, गारपीट, वीज पडणे, पूर, दुष्काळ, पावसातील खंड, चक्रीवादळ, रोग इ. कारणांमुळे पिकांच्या उत्पादनात घट येत असल्यामुळे व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे. हा पीक विमा योजना रिलायंन्स जनरल इन्शुरन्स कंपनीकडून राबविण्यात येत आहे, ही योजना जिल्ह्यात फक्त २ वर्ष आहे.
10 जुलैपासून संपूर्ण राज्यात पाऊस जोर पकडण्याची शक्यता
पीकविमा भरण्यासाठी विहित नमुना अर्ज, आधारकार्ड, सातबारा, पेरणी स्वयंघोषणापत्र, भाडेपट्टा करार संमतीपत्र किंवा शेतकऱ्याचा करारनामा तसेच बँक पासबुक प्रत इ. कागद पत्रे असणे आवश्यक आहे. विमा योजनेत सहभागी होयचे असेल तर मुदत संपायच्या ७ दिवस आधी शेतकऱ्यांचे घोषणपत्र प्राप्त झाले की जे कर्जदार शेतकरी आहेत आहेत त्यांना पुढील हंगामाकरिता योजनेतून वगळण्यात येईल.
शेतकऱ्यांची स्वतःची स्वाक्षरीसह या योजनेत सहभागी न होण्यासाठी घोषपत्र न देणाऱ्या शेतकऱ्यांचा या योजनेमध्ये सहभाग असल्याचे समजले जाईल, तसेच बँक मध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी व शेतकऱ्यांना अर्ज भरण्यासाठी सुलभता यावी म्हणून सीएससी केंद्रामार्फत ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरू शकता. अधिकारी संतोष आळसे यांनी जास्तीत जास्त शेतकरी सहभागी व्हावे असे सांगितले आहे.
Share your comments