1. बातम्या

Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले 'हे' महत्त्वाचे ११ निर्णय; जाणून घ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.8) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचसोबत मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी असलेली एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.

भावना भालशंकर
भावना भालशंकर
Cabinet Decision

Cabinet Decision

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (दि.8) रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये धनगर समाजाच्या विकासासाठी शक्तीप्रदत्त समिती स्थापन करण्यात येणार आहे. त्याचसोबत मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी असलेली एअर इंडियाची इमारत ताब्यात घेण्यासाठी पावले उचलण्यात येणार आहेत.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील प्रमुख निर्णय -
धनगर समाजाच्या उन्नतीकरिताच्या योजना प्रभावीरीत्या राबविणार. योजनांचे सनियंत्रण करणार शक्तीप्रदत्त समिती. (इतर मागास बहुजन कल्याण)
राज्यातील निर्यातीला वेग देणार. राज्य निर्यात प्रोत्साहन धोरण मंजूर. शेतकऱ्यांनाही फायदा. ४२५० कोटी तरतुदीस मान्यता. (उद्योग विभाग)
मंगरूळपीर तालुक्यातल्या बॅरेजेसना मान्यता. वाशीम जिल्ह्यातील गावांना मोठा फायदा. २२०० हेक्टरपेक्षा जास्त जमीन सिंचित होणार. (जलसंपदा विभाग)
अनुदानित खासगी आयुर्वेद, युनानी महाविद्यालयांतील अध्यापकांची पदे राज्य निवड मंडळामार्फत भरणार. (वैद्यकीय शिक्षण)
मेगा वस्त्रोद्योग प्रकल्पांना देखील सामुहिक प्रोत्साहन योजनेचा लाभ मिळणार. राज्याच्या वस्त्रोद्योग धोरणात सुधारणा. (वस्त्रोद्योग विभाग)

गणित, विज्ञानात विद्यार्थ्यांना पारंगत करणार. आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची २८२ पदे भरणार. (इतर मागास बहुजन कल्याण )
विदर्भात ५ ठिकाणी आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्रे उभारणार. संत्रा उत्पादकाना मोठा फायदा. (सहकार विभाग)
मॉरिशस येथे महाराष्ट्राची माहिती देणारे पर्यटक केंद्र व बहुउद्देशीय संकुल उभारणार. (पर्यटन विभाग)
बारामती येथे पोलीस श्वान प्रशिक्षण केंद्र उभारणार. (गृह विभाग)
महाराष्ट्र बोव्हाईन ब्रिडिंग रेग्युलेटरी अथॉरिटी स्थापणार. रेतन केंद्रे रोगमुक्त करणार. (पशुसंवर्धन)
नरिमन पॉइंट येथील एअर इंडिया इमारत लवकर ताब्यात घेण्यासाठी पाऊले. एअर इंडियाचे सर्व अनर्जित उत्पन्न व दंड माफ. (सार्वजनिक बांधकाम विभाग)

English Summary: 'These' 11 important decisions were taken in the state cabinet meeting; find out Published on: 08 November 2023, 06:02 IST

Like this article?

Hey! I am भावना भालशंकर. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters