सातबारा उतारा म्हटलं म्हणजे शेतकऱ्यांसाठीचं महत्वाची कागदपत्र आहे. शेतकरी जमिनीचा मालक आहे याचे ओळखपत्र जणू सातबारा असतो. सरकार जमीनविषयी कागदपत्रांमध्ये वेळोवेळी बदल करत असते.
आतासुद्धा सातबारा उतारा मध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. मार्चपर्यंत त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. सातबारा उतारा मध्ये पोटखराब म्हणून काही क्षेत्राची बंद असते. या क्षेत्राचे शेतकऱ्यांना पीककर्ज, पीकविमा अथवा नैसर्गिक आपत्ती इत्यादी प्रकारची नुकसान भरपाईमिळत नाही. परंतु नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर मार्चअखेरीस पोटखराब क्षेत्र ऐवजी लागवडीयोग्य क्षेत्र असून नोंद होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे.
यासाठी शेतकऱ्यांनी स्थानिक तलाठ्याकडे अर्ज करायचा आहे. पोटखराब क्षेत्राचा पीक पाण्याचा सर्वे स्थानिक तलाठी आणि भूमी अभिलेख विभाग करतील. याबाबतचा अंतिम निर्णय हा उपविभागीय अधिकारी म्हणजे प्रांत अधिकारी यांचा असेल.प्रांताधिकारी याबाबतचा अहवाल वेळोवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला सादर करतील.
मार्च महिन्याच्या अखेरीस पोटखराब जमिनीचा महाराष्ट्र जमीन महसूल कायदा अंतर्गतलागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करून देण्यात येणार आहे.
Share your comments