भारतातील लोकांचा प्रमुख व्यवसाय हा शेती आहे सुमारे 90 टक्के लोकसंख्या शेती व्यवसाय करून आपली उपजीविका करत आहे. येथील शेतकरी बांधव हंगामानुसार शेती करतात येथे प्रामुख्याने रब्बी आणि खरीप हंगाम हे हंगाम आढळतात. या हंगामामध्ये वेगवेगळी पिके घेतली जातात. तसेच नगदी पीक सुद्धा घेतली जातात.
ऊस कापूस, तंबाखू, निळ, कांदा ही पिके शेतकरी वर्गाला जास्तीत जास्त नफा मिळवून देत असतात. या पिकांना नगदी पिके सुद्धा म्हणतात. साखर उत्पादनात आपला भारत देश दुय्यम स्थानावर आहे तसेच गेल्या काही दिवसांपासून ऊस लागवडीखाली क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचे दिसून येत आहे परंतु यंदाच्या वर्षी जरा वेगळी चिन्ह दिसत आहेत.
हेही वाचा:-आपल्या काही चुकीच्या सवयींमुळे शरीरातील हाडे होतात कमजोर, वेळीच व्हा सावध..
यंदा च्या वर्षी शेतकरी वर्गाचे पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतातील सर्वात जास्त ऊस उत्पादक राज्य म्हणून उत्तर प्रदेश या राज्याला ओळखले जाते. देशातील सर्वात जास्त ऊस लागवडीखाली आणि साखर उत्पादनात अग्रेसर असलेले उत्तर प्रदेश राज्य यंदा च्या वर्षी अडचणीत सापडले आहेत. यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे समजते आहे त्यामुळे यंदा च्या वर्षी ऊस उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उसात सतत पाणी साचून राहिल्याने पीक कुजण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तसेच अती पावसामुळे तोडणीला आलेला ऊस रानात आडवा झाला आहे शिवाय ऊस पोकळ झाल्याने उसाच्या वजनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा ऊस उत्पादनात घट होण्याची शक्यता वर्तवली जातेय.
हेही वाचा:-आता शासकीय केंद्रावर शेतीमाल खरेदीत व्यापाऱ्यांच्या गैरकारभाराला बसणार चाप, वाचा सविस्तर
उत्तर प्रदेशात यंदा साखरेचे निव्वळ उत्पादन १२० लाख टन होईल असा अंदाज व्यक्त केला जात होता. सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाल्याने उत्पादन अंदाजा इतकी होईल, असे चित्र होते. पण दिलासादायक असणारा पाऊस नंतरच्या टप्प्यात मात्र अडचणीचा ठरत गेला. ऊस क्षेत्र असणाऱ्या अनेक ठिकाणी अति पावसामुळे पाणी साचून राहिले. त्यामुळे ऊस कुजण्याची भीती वाढली आहे शिवाय सतत पाणी साचून राहिल्याने पीक खराब होण्याचा धोका जास्त वाढला आहे. त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडला आहे.
Share your comments