1. बातम्या

पिक विमामध्ये झाला आहे घोटाळा! माजी मुख्यमंत्र्यांचा महाविकास आघाडी सरकारवर आरोप

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांना पुरत हैराण करून सोडले आहे, तसेच सरकारच्या काही धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यात हिवाळी अधिवेशन आज आज सुरू झाले याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर मोठा घणाघाती हल्ला केला. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी संवाद शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जास्त भर दिला. माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते यांच्या मते, यावर्षी शेतकऱ्यांचे नैसर्गिक अवकृपेमुळे मोठे नुकसान झाले आहे, खरीप हंगामात आलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून पूर्ण खरीप हंगाम गेला आहे

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
devendra fadnavis

शेतकऱ्यांना कवडीचे ही उत्पन्न खरीप हंगामातुन प्राप्त झालेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे, पण राज्य सरकारकडून मदत न दिली जाता याउलट शेतकऱ्यांची कोंडी केली जात आहे. शेतकरी राजा कसाबसा खरीप हंगामाचे नुकसान विसरून रब्बी हंगामाकडे वळला होता मात्र रब्बी हंगामातील पिके वाढीसाठी तयार झाली असताना राज्य सरकारने सक्तीची वीजबिल वसुली करायला सुरुवात केली, शेतकऱ्यांचा वीजपुरवठा देतील खंडित केला जात आहे.  त्यामुळे रब्बी हंगामात पिकासाठी पोषक वातावरण असताना देखील सरकारच्या या धोरणामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. म्हणून मध्यंतरी आलेल्या अवकाळी पेक्षा सरकारचे धोरण हे जास्त घातक असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.

रब्बी हंगामातील पिके बहरत असतानाच सरकारने सक्तीची वीजबिल वसुली करण्याचे ठरवले, यामुळे रब्बी हंगामातील पिकांना चांगला मोठा फटका बसताना दिसतोय, त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना छळण्याचा मानस आहे. म्हणून सत्तेची वीज बिल वसुली थांबवावी आणि शेतकऱ्याला दहा तास वीजपुरवठा दिला जावा ही मागणी केली जाणार असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

फडणवीस यांचा मोठा आरोप

राज्यात शेतकऱ्यांनी सहा हजार कोटी रुपये पिक विमा काढण्यासाठी मोजले आहेत, पण शेतकऱ्यांना अजूनही पिकविण्याचा पैसा मिळालेला नाही.

पिकविमाची योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पैकी एक आहे. मोदी सरकारने नुकसानी प्रमाणे पैशांचे वाटप केले मात्र महा विकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना ते पैसे अद्यापही दिलेले नाहीत. म्हणून यात मोठा घापला झाला असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. तसेच त्यांनी त्यांच्या सरकारचे बखान देखील सांगितले त्यांनी सांगितले की, भाजप सरकार असतांना शेतकऱ्यांच्या मदतीकडे विशेष लक्ष दिले जात होते.

English Summary: there has been a scam in crop insurance former cm accuses mahavikas aaghadi sarkar Published on: 22 December 2021, 04:13 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters