खरीप हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे, खरीप हंगामातील अनेक पिकांचे मोठे नुकसान झाले होते. खरीप हंगामात सर्वात जास्त नुकसान डाळवर्गीय पिकांचे झाले असल्याचे सांगितले जात आहे. तुरीच्या पिकाचे देखील खरीप हंगामात मोठे नुकसान झाले असल्याने, उत्पादनात विक्रमी घट नमूद करण्यात आली आहे आणि म्हणूनच याचा परिणाम तुरीच्या बाजारभावावर होत असून ग्राहकांच्या खिशाला देखील यामुळे कात्री बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. देशांतर्गत बाजारपेठेत तुर समवेतच इतर सर्व डाळीच्या दरात उल्लेखनीय चढ-उतार नजरेस पडत आहे. जानकार लोकांच्या मते, खरिपात झालेले तूर डाळीच्या नुकसानामुळे यावर्षी तुर 125 रुपये प्रति किलोपर्यंत देखील विकली जाऊ शकते.
देशातील शेतकरी बांधवांसाठी खरिपाचा हंगाम इतर हंगामापेक्षा महत्त्वाचा असतो, मात्र याच हंगामात अवकाळी पावसाने त्राहिमाम् माजवला होता आणि त्यामुळे खरीप हंगामातील सर्वच पिकांच्या उत्पादनात उल्लेखनीय घट नमूद करण्यात आली होती. खरीप हंगामात वारंवार येत असलेल्या पावसामुळे तुरीच्या पीकावर पुरता विपरीत परिणाम बघायला मिळाला. तुरीचे पीक पावसामुळे संपूर्ण वाया गेले होते, तूर उत्पादक शेतकऱ्यांना तुरीच्या पिकातून थोडे फारच उत्पादन पदरी पडण्याची आशा आहे. बाजारपेठेत अजूनही नवीन तुरदाळ येण्यास वाव आहे, कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते आणि बाजारपेठेतील व्यापाऱ्यानुसार, नवीन तूर डाळ येण्यास जवळपास एक महिन्याचा कालावधी शेष आहे. बाजारपेठेत जुन्या डाळीला मागणी कमी झाली आहे त्यामुळे तुरीचे दर हे शंभरीवर अडकून पडले आहेत.
नवीन तुरदाळ येण्यास अजून विलंब असल्याने तूरडाळीच्या दरात येत्या काही आठवड्यात चढ-उतार अशीच कायम राहण्याची शक्यता आहे. मात्र व्यापाऱ्यांनी, मार्च महिन्यानंतर तूर डाळीचे दर गगनभरारी घेतील असे संकेत दिले आहेत व्यापाऱ्यांच्या मते, राज्यासमवेतच संपूर्ण देशांतर्गत पावसामुळे तुरीच्या पीकावर मोठा विपरीत परिणाम घडून आला आहे आणि त्यामुळे उत्पादन विक्रमी कमी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे बाजारपेठेच्या गणितानुसार, उत्पादनात घट झाली की बाजार भावात तेजी ही साहजिकच येणार आहे.
कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, मार्चनंतर मागणीनुसार तूर डाळचा पुरवठा जर झाला नाही तर तूर डाळीचे दर आकाशाला गवसणी घालतील. तसेच यावर्षी अद्यापही कर्नाटकातून तुरीची डाळ महाराष्ट्रात दाखल झाल्याचे चित्र दिसत नसल्याने तूर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांनी तूर डाळ वाढीचे संकेत दिले आहेत.
Share your comments