1. बातम्या

Tomato Chori : शेतातून २ लाख ७० हजारांचे टोमॅटोची चोरी; शेतकरी चिंतेत

चालू बाजारभाव प्रमाणे २ लाख ७० हजारांची रुपये किमतीच्या टोमॅटोची चोरी झाली असल्याची माहिती धनाजी भोसले आणि बालाजी भोसले यांनी दिली आहे.

Tomato Update

Tomato Update

सोलापूर

टोमॅटोचे दर वाढल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातून थेट टोमॅटोची चोरी होऊ लागल्याच्या घटनात वाढ होऊ लागली आहे. सोलापूर, कोल्हापूर, नाशिक या भागातील शेतकऱ्यांच्या शेतात चोरी झाल्याच्या घटना उघड झाल्या आहेत.

सोलापुरामधील पडसाळी येथिल शेतकरी बालाजी भोसले आणि धनाजी भोसले यांच्या शेतातील २ लाख रुपयांची टोमॅटो चोरी झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे. 

चालू बाजारभाव प्रमाणे २ लाख ७० हजारांची रुपये किमतीच्या टोमॅटोची चोरी झाली असल्याची माहिती धनाजी भोसले आणि बालाजी भोसले यांनी दिली आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, टोमॅटो चोरीस गेलेल्या शेतकऱ्यांविषयी आजूबाजूच्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

कोल्हापुरमधील शिरोळ तालुक्यात देखील चोरीची घटना

शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथिल अशोक मस्के या शेतकऱ्याच्या शेतातील देखील ५० हजार रुपयांचे टोमॅटो चोरीला गेल्याची घटना घडली आहे. म0स्के हे प्रत्येक वर्षी थोड्या क्षेत्रावर टोमॅटो करतात. त्यांचा यंदाचा तोडा सुरु होता. बुधवारी (ता.२६ जुलै) सायंकाळी त्यांनी टोमॅटोची स्थिती पाहून गुरुवारी (ता.२७) टोमॅटो तोडण्याचे नियोजन केले. पण त्याआधीच त्यांच्या शेतात देखील चोरीची घटना घडली आहे.

English Summary: Theft of tomatoes worth 2 lakh 70 thousand from the farm Farmers worried Published on: 11 August 2023, 02:02 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters