1. बातम्या

महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करावीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Chief Minister Devendra Fadnavis News

Chief Minister Devendra Fadnavis News

मुंबई : राज्यात विविध क्षेत्रांसाठीच्या वीजेची मागणी लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीतपणे करण्यासाठी महापारेषणच्या विविध मंजूर प्रकल्पाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित महापारेषण प्रकल्पांबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हे निर्देश दिले. बैठकीस राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकरआमदार दिलीप वळसे पाटीलमुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडेअप्पर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकरऊर्जा विभागाच्या अप्पर मुख्य सचिव आभा शुक्लापर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगलमहापारेषण  अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ संजीव कुमारयांच्यासह इतर संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. तसेच संबंधित जिल्हाधिकारी पोलिस अधीक्षक दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापारेषणच्या विविध जिल्ह्यातील प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन सर्व ठिकाणची कामे तातडीने विनाविलंब पूर्ण करण्याचे निर्देश दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, पालघरमध्ये जास्त प्रमाणात कामे प्रलंबित असून त्या कामांची तातडीने पूर्तता करावी. वाढवणच्या दृष्टीने विचार करुन टीबीसीबी प्लॅनिंग अतंर्गत गतीशक्ती प्लॅटफॉर्मवर त्याच्या नियोजनाचा विचार करावा. तसेच नवी मुंबई डेटा सेंटर हबला ग्रीन पॉवर देण्याच्या अनुषंगाने नियोजन करण्याचे सूचित करुन मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले कीस्थानिक राजकीय वा इतर कुठल्याही हस्तक्षेपाला जुमानता सर्व संबंधित यंत्रणांनी ट्रान्समिशन टॉवरच्या उभारणीच्या कामांना गती द्यावी. यासाठी आवश्यक त्या जिल्ह्यांमध्ये पोलिस अधिक्षकांनी पोलिस संरक्षण उपलब्ध करुन द्यावे. सर्व यंत्रणांनी परस्पर सहकार्याने पारेषण प्रकल्पांचे काम  गतीने पुढे नेण्याची खबरदारी घेण्याचे मुख्यमंत्री यांनी यावेळी सूचित केले. राज्याच्या वाढीव वीजेची मागणी लक्षात घेता सर्व क्षेत्रांना आवश्यक वीज उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने हे प्रकल्प पूर्ण होणे महत्वाचे  आहेत्यादृष्टीने संबंधित यंत्रणांनी कामांची अंमलबजावणी अधिक गतीमान करुन सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

बैठकीत बभालेश्वर-कुडुसशिक्रापुर-रांजणगावजेजुरी-हिंजवडीपडघे-वाडा आणि कोलशेत-वाडाविशविंद-भेंडाबभालेश्वर-राजूरी-अहिल्यानगर एमआयडीसीबोईसर(एमआयडीसी)-डहाणूपडघे वाडानागेवाडी-भोकरदनडहाणू सुर्यानगर एमएमआरडीए आणि कावदास जव्हार,धानोरा यावल ते चोपडाउमरेड-नागभीडया वीज वाहिन्यांच्या कामाबाबत आढावा घेण्यात आलाट्रान्समिशन नेटवर्क विस्तार योजना २०२४-३४ अतंर्गत ,५४,५२२ कोटींची गुंतवणूक करण्यात येणार असून ८६,६५६ नवीन कॉरीडॉरचे काम करण्यात येणार आहेया संदर्भातील कामांच्या नियोजनाबाबत विभागाच्या अपर मुख्य सचिव आभा शुक्ला यांनी सविस्तर माहिती दिली.

English Summary: The works of various approved projects of Mahapareshan should be completed immediately Chief Minister Devendra Fadnavis Published on: 26 March 2025, 11:13 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters