चोरी झाल्यावर आपण वस्तू चोरीला गेलेल्या बातम्या वाचल्या असतील. मात्र, आज आपण चक्क विहीर चोरीला गेली आहे, याची बातमी पाहणार आहोत.पालघर जिल्ह्यातील (Palghar) डहाणू (Dahanu) तालुक्यातील एका गावात असाच एक प्रकार समोर आला आहे.
काय आहे प्रकार?
उर्से आंबाडी पाडा येथील विहिरीचे काम ग्रामपंचायत पेसा योजनेतून मंजूर होऊन या कामासाठी दोन लाख 50 हजारांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर निविदा प्रक्रियेद्वारे काम वाटप होऊन काम सुरू करण्याचा आदेश देण्यात आला होता.
मात्र ठेकेदाराकडून प्रत्यक्ष कामाला सुरुवात न करताच एका बांधकाम साहित्याचा पुरवठा करणाऱ्या वाघोबा ट्रान्सपोर्ट नावाच्या खात्यावर ग्रामपंचायतीच्या तिजोरीतून 82 हजारांचा धनादेश देण्यात आला.
आनंदाची बातमी! या दिवाळीत अर्ध्या किंमतीत मिळणार ट्रॅक्टर; असा घ्या लाभ
विहिरीचे काम न करताच 82 हजाराच्या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डहाणू तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत उर्सेमध्ये 'पेसा' निधीमधून एक विहीर मंजूर करण्यात आली होती. मात्र, विहीर जागेवर नसल्याचे म्हटले जात आहे.
हा धनादेश कामाचे कंत्राट घेणारी व्यक्ती किंवा एजन्सीच्या नावे देणे आवश्यक आहे. मात्र, बांधकाम साहित्य पुरविणाऱ्या व्यक्तीच्या नावे देण्यात आल्याने यात मोठं गौडबंगाल असल्याचा आरोप केला जात आहे.
हेही वाचा: EPFO: दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीएफचे व्याज, जाणून घ्या बॅलन्स कसा तपासायचा..
प्रस्तावित विहिरीच्या ठिकाणी बांधकाम साहित्य टाकलं गेल्याचं सांगण्यात येतं आहे. मात्र प्रत्यक्षात जागेवर ना विहिरीचे खोदकाम झाले, ना विहिरीच्या बांधकामासाठी लागणारी साधन सामग्री टाकण्यात आली आहे.
विहीर न बांधता त्या जागेवर फक्त एक ट्रक डब्बर टाकून 80 हजार रुपये लाटले असून आम्ही पालघर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर ठेकेदार व ग्रामविकास अधिकारी यांच्या वर्ती गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहोत, असे तक्रारदार आशिष चव्हाण यांनी सांगितले आहे.
हेही वाचा: मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिवसेना 'या' चिन्हाची मागणी करणार
Share your comments