शेतकऱ्यांची एवढ्या दिवसाची प्रतीक्षा असणारी आता ती काही क्षणात पूर्ण होत आहे. कृषी जागरणच्या वतीने आयोजित करण्याला आलेला मिलिनिअर फार्मर्स ऑफ इंडिया अवार्ड प्रायोजक महिंद्रा ट्रॅक्टर कार्यक्रम आज संपन्न होत आहे. तर या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी देशभरातून शेतकरी उपस्थित आहेत.
समाजामध्ये सेलिब्रिटी अभिनेते राजकीय नेते या लोकांचा सातत्याने सन्मान होताना दिसतो, पण कृषी जागरण आणि महिंद्रा ट्रॅक्टर यांच्या वतीने देशभरातील शेतकऱ्यांचा 6 डिसेंबर ते 8 डिसेंबर या दरम्यान दिल्लीमध्ये भव्य दिव्य असा सन्मान केला गेला आहे.
आज या कार्यक्रमाला सुरुवात होत असुन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. यासोबतच 'MFOI' ने सुरू केलेल्या किसान भारत यात्रेला देखील गडकरींच्या हस्ते हिरवा कंदील दाखवला जाणार आहे.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार:
या कार्यक्रमासाठी आचार्य देवव्रत-गुजरातचे राज्यपाल, नितीन गडकरी - रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, परषोत्तम रूपाला- मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री, साध्वी निरंजन ज्योती - ग्रामीण विकास मंत्री, पी.सथसिवम - भारताचे सरन्यायाधीश आणि केरळचे राज्यपाल, प्रताप सारंगी- लोकसभा सदस्य ओडीशा, महेंद्रसिंग सोळंकी - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती, पोचा ब्रम्हानंदा - लोकसभा सदस्य - कृषी संसदीय स्थायी समिती - आंध्रप्रदेश, शंकर लालवानी - लोकसभा सदस्य -इंदोर हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.
या कार्यक्रमात देशभरातील ७५० कृषी विज्ञान केंद्र (KVK) सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर केव्हीके अंतर्गत येणारे शेतकऱ्यांची संख्या ७५० पेक्षा जास्त असणार आहे. तसंच थेट शेतकऱ्यांची संवाद साधल्यामुळे अर्थातच नॉन केव्हीके अंतर्गत येणारे शेतकरी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित असणार आहेत.
पुरस्कार कसे असणार -
शेतकरी - ७८७
बिलिनीयर - ५० पेक्षा जास्त
मिलिनीयर - ६०० पेक्षा जास्त
राज्य - ६० पेक्षा जास्त
"प्रत्येक शेतकरी करोडपती होण्याची आकांक्षा बाळगतो आणि ज्यांनी ही कामगिरी केली त्यांचा सन्मान केला पाहिजे. लोकांचा शेतकरी आणि शेतीबद्दलचा विचार बदलणे हा त्यांचा उद्देश आहे. ते स्वतः शेतकरी कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडीलही शेतकरी होते आणि त्यांनी वयाच्या १४ व्या वर्षापर्यंत शेतीही केली होती.जेव्हा जेव्हा त्यांनी शेती सोडून इतर क्षेत्रांकडे पाहिले तेव्हा कोणी ना कोणी रोल मॉडेल म्हणून सादर केले. पण, कृषी क्षेत्रात ना कुठला रोल मॉडेल आहे ना तो मोठ्या प्रमाणावर मांडला जात आहे. हे लक्षात घेऊन हा उपक्रम सुरू करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. मी वर्षापूर्वी पाहिलेल्या स्वप्नाला ‘MFOI पुरस्कार’ असे नाव देण्यात आले आहे. कृषी जागरण भविष्यात शेतकऱ्यांसाठी इतरही अनेक पुरस्कार शो आयोजित करेल."
एम.सी.डोमॅनिक, कृषी जागरण संस्थापक आणि मुख्य संपादक
“गेल्या काही दशकांमध्ये कृषी क्षेत्रातील महिलांची भूमिका झपाट्याने वाढली आहे. महिला शेतकऱ्यांनी या क्षेत्रात प्रत्येक पावलावर आपले योगदान दिले आहे, तरीही महिला या क्षेत्रात आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहेत. मला आशा आहे की, 'द मिलियनेअर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड-2023' मध्ये त्या महिला शेतकऱ्यांना पुरस्कृत केल्याने ज्यांनी कृषी क्षेत्रात स्वावलंबी बनून चांगली कामगिरी केली आहे, महिला शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता बदलेल. तसेच हा पुरस्कार सोहळा यशस्वी करण्यासाठी तुम्हा सर्व शेतकऱ्यांना आमंत्रित करण्यात येत आहे.”
शायनी डॉमिनिक, व्यवस्थापकीय संचालक – कृषी जागरण
Share your comments