राज्यात सध्या अनेक ठिकाणी गारपिट झाली. यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. अनेकांची पिके ही जमीनदोस्त झाली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले असून मदतीची मागणी केली जात आहे.
वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने फळबागांचे मोठे नुकसान झाले. केळी कलिंगड, खरबुजांच्या बागा या अस्मानी संकटात उद्ध्वस्त झाल्या आहेत. गारांचा मार लागल्याने कलिंगडासह खरबुजांची फळे खराब झाली आहेत.
या आर्थिक संकटाने फळबागा उत्पादक शेतकरी हवालदिल झाले. उत्पादनाचा खर्चही निघणे अवघड झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यातच अद्याप पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करायला बांधावर सरकारचा कुणीही कर्मचारी फिरकलेला नाही.
शेतकऱ्यांनो जनावरांची शिंगे कापण्याकडे करू नका दुर्लक्ष, होतील हे घातक आजार..
असे असताना सोलापुरातील एका द्राक्ष उत्पादकाने दोन एकर द्राक्षबाग वाचवली. या शेतकऱ्याने साड्यांचा वापर केला. जिथं जिथं द्राक्षे आहेत, तिथं त्याने साडी बांधली.
त्याच्याकडे दोन एकर जागेत द्राक्ष आहेत. यासाठी एक हजार साड्यांचा वापर त्यासाठी त्याने केला. एक हजार साड्यांसाठी त्याला एक लाखापेक्षा जास्त खर्च आला. असे असताना द्राक्षबाग वाचल्याने आता तो पैसा निघणार असल्याचे द्राक्ष उत्पादकाचे म्हणने आहे.
शेतकऱ्यांनो कांदा काढताना घ्यावयाची काळजी
माढ्यातील बाळासाहेब नाईकनवरे या शेतकऱ्याने ही किमया केली. दोन एकर द्राक्ष बागेची हानी होऊ नये म्हणून एक हजार साड्यांचा वापर केला. त्याच्या या प्रयोगामुळे द्राक्ष बाग सुरक्षित ठेवले. यामुळे त्यांची चर्चा सुरू झाली आहे.
गाय आणि म्हशी कमी दूध देतात? याकडे लक्ष द्या होईल फायदा..
राज्यात दोन वर्षात येणार 900 ऊसतोडणी यंत्रे, मजुरांना अतिरिक्त पैसे देण्याची गरज पडणार नाही..
Share your comments