MFOI 2024 Road Show
  1. बातम्या

देशातील आदिवसींकडे ८ हजार औषधी वनस्पतींचा आहे खजिना

सध्या देशात कोरोनाने जगात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. या कोरोनाशी लढा देण्यासाठी आपी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचा ओढा आयुर्वेदाकडे वाढला असून औषधी वनस्पती जोपण्याचा प्रयत्न केला जात आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

 
सध्या देशात कोरोनाने जगात थैमान घातले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे.  या कोरोनाशी लढा देण्यासाठी आपी रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे आवश्यक आहे. यासाठी नागरिकांचा ओढा आयुर्वेदाकडे वाढला असून औषधी वनस्पती जोपण्याचा प्रयत्न केला जात आहे.  बरेच  आजार हे आयुर्वेदामुळे बरे होतात. त्यातील काही आजार म्हणजे  मलेरिया यासाठी सिंकोना साल वापरतात. यातील क्विनाइमुळे मलेरिया बरा होता. अशक्तपणावर हळंद्याचे कंद, शक्तीपातावर निर्गुडीचा पाला, कावळी झाल्यावर अंखरा हळंद्याचा कंद खायाला दिल्यास हा आजार बरा होतो.

आरोग्य हीच खरी संपत्ती म्हटले जाते, ही संपत्ती वाचवण्यासाठी आपल्याला आदिवासी भागात जावे लागेल. कारण आदिवसी भागात ८ हजाराहून अधिक औषधी वनस्पती असल्याची माहिती पर्यावरण मंत्रालयलाने दिली आहे. त्यावर सरकारने योग्य नियोजन करुन  त्या त्या आदिवासी भागात  संशोधन केंद्र वनस्पती  जतनासाठी मार्गदर्शन त्यांची बाजारपेठ तयार करणे, आदींची अंमलबाजावणी  करणे गरजेचे आहे. त्यातून आदिवासींना रोजगार उपलब्ध होईल आणि  लोकवनस्पतींचे संवर्धन  करता येईल.  त्यामुळे समाजाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. 

भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयातर्फे  आदिवासी भागातील लोकवस्ती विज्ञान हा प्रकल्प काही वर्षांपुर्वी घेतला होता. त्यात देशातील २० संस्थांचा सहभाग होता. याच्या मार्फत  आदिवासी  क्षेत्रातून वनस्पतींची माहिती संकलित करण्यात आली .  दहा हजारपेक्षा अधिक वनस्पतींची उपयोगिता समोर आली. त्यात ८ हजार वनस्पतींचे २५ हजार औषधी उपयोग नोंदविले गेले.  सहा हजार नवीन उपयोग समोर आले.  कारण आयुर्वेदात २ हजार वनस्पतींची माहिती आहे, अशी माहिती ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉ.  विनया घाटे यांनी दिली.   सध्या आदिवासी भागातील नवी पिढी  कामधंद्यासाठी शहराकडे येत आहे. त्यांना तक्यांच्या  भागातच रोजगार उपलब्ध व्हायला हवा.  स्थानिक पातळीवर कोणत्या वनस्पती येतात आणि  त्यांचे उपयोग, त्याला  बाजारपेठ कुठे ही साखळी  तयार व्हायला हवी सरकारने यासंदर्भात पुढाकार घेऊन मार्गदर्शन करुन रोजगार द्याला हवा.

English Summary: The tribals of the country have a treasure trove of 8,000 medicinal plants Published on: 11 August 2020, 05:17 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters