टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावर झाल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. टोमॅटो वाहतूक खर्च, लागवड खर्च मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. बाजार समितीच्या आवारात साधारणपणे एक किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार पाच ते दहा रुपये किलो भाव मिळत आहे. त्यामुळे टोमॅटोला उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे.
नवीन टोमॅटोची आवक राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात सुरू झाली आहे. किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो टोमॅटोचे भाव ६० ते ८० रुपयांवरून घासरून १० ते २५ रुपयांपर्यंत आहेत.
टोमॅटोला कवडीमोल भाव मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. लागवड खर्च, वाहतूक खर्च न मिळाल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली आहे.
आंबा प्रेमींसाठी खुशखबर! आफ्रिकेतल्या मलावीचा 'हापूस' आंबा APMC मध्ये दाखल
राज्यात टोमॅटोची मोठ्या प्रमाणावर लागवड नाशिक, पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागात केली जाते. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर परिसरात टोमॅटोची लागवड केली जाते.
देवगडचा हापूस APMC मध्ये दाखल; हापूसला मिळाला नऊ हजारांचा विक्रमी दर
गेल्या दोन आठवड्यांपासून टोमॅटोची आवक वाढली असून वाशीतील नवी मुंबई बाजार समिती तसेच पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात दररोज साधारणपणे सहा ते पंधरा हजार टोमॅटोच्या पेट्यांची आवक होत आहे. रविवारी टोमॅटोची आवक दुपटीने वाढली आणि दरात मोठी घसरण झाली आहे.
Share your comments