देऊळगाव राजा: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सलग्न समर्थ कृषि महाविद्यालय येथील चतुर्थ वर्षांत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाअंतर्गत बियाणे उगवण चाचणी कशी करावी व तिचे फायदे काय याचे मार्गदर्शन केले.
सध्याच्या काळामध्ये पेरणी अगोदर बियाणे उगवण चाचणी करने फार महत्त्वाचे आहे या मुळे शेतकऱ्याला त्याच्या बियाण्याची उगवण शमता व टक्केवारी समजते व शेतकऱ्याच्या नुकसानीची शक्यता कमी होते.
प्रत्येक शेतकरी बांधवांनी पेरणी पूर्वी बियाणे उगवण चाचणी करावी हा ह्या कार्यक्रमा मागचा हेतू होता. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा देखील होणार आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लोगले होते.
या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.नितिन मेहेत्रे सर , रावे समन्वयक प्रा.मोहजीतसिंह राजपूत सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समर्थ महाविद्यालयाचे विद्यार्थी, अनिरुद्ध उगले,विठ्ठल उगले,रंजीत वाघ संकेत वाघ उपस्थित होते.
10 गुंठ्यातील वांग्याने केले लखपती, इंदापूरमध्ये युवा शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
सिद्धार्थ वाघमारे,अभिषेक वऱ्हाटे,मंगेश येवले,मेघराज गवते,सौरभ शिंदे, गौरव बाहेकर,सौरव इंगळे,महेश कापसे व वैभव उन्होने हे उपस्थित होते.
आता तर काळजीच मिटली! भारतातील पहिली इलेक्ट्रीक सोलर कार, उन्हापासून होणार चार्ज
Share your comments