1. बातम्या

काळ्या मातीतले टाटा-अंबानी; भारतातील ‘हे’ सर्वात श्रीमंत शेतकरी

मुंबई- शेती हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. नापिकी, अतिवृष्टी, कमी बाजारभाव यासह एकाधिक संकटे आपल्याला शेतकऱ्यांसमोर पाहायला मिळतात. स्मार्ट पद्दतीने शेतीतून आपल्या यशाचा मार्ग निर्माण करणारे काही शेतकरीही आहेत.

ललिता बर्गे
ललिता बर्गे
money

money

मुंबई-  शेती हा तोट्याचा व्यवसाय मानला जातो. नापिकी, अतिवृष्टी, कमी बाजारभाव यासह एकाधिक संकटे आपल्याला शेतकऱ्यांसमोर पाहायला मिळतात. स्मार्ट पद्दतीने शेतीतून आपल्या यशाचा मार्ग निर्माण करणारे काही शेतकरीही आहेत. 

1. प्रमोद गौतम 

ऑटोमोबाईल श्रेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व असलेल्या प्रमोद गौतम यांनी 2006 मध्ये शेती व्यवसायास प्रारंभ केला. प्रयोगशाली शेतीची कास धरणारे गौतम यांचा वर्षाला कोटी रुपयांचा टर्नओव्हर आहे. सुरूवातीच्या टप्प्यात प्रमोद यांनी भुईमूग आणि हळदीच्या शेतीचा प्रयोग केला. मात्र, पुरेशा प्रमाणात त्यांना महसूल प्राप्त झाला नाही.

प्रमोद गौतम यांना मजूरांची कमतरता भासली. त्यावेळी त्यांनी ड्रायव्हर विरहित चालणाऱ्या ट्रॅक्टरचा आपल्या शेतात उपयोग केला. महागडी उपकरणेच वापरायला हवी यामताचे गौतम नाहीत. शेतकऱ्यांना बाजारपेठेचं आकलन असल्यास अधिक नफा मिळू शकतो असे गौतम यांचे म्हणणे आहे.

संत्री, पेरु, लिंबू, तूर दाळ यांच्या उत्पादनास सुरुवात केली. विशेष म्हणजे प्रमोद यांनी शेतातच निर्मिती उद्योगांना सुरुवात केली. त्यामुळे शेतीपूरक उत्पादनातून त्यांना उत्पन्नाचा नवा मार्ग गवसला.  

2. सचिन काळे (Sachin Kale)

शिक्षणाने मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या सचिन काळे यांची आज प्रतिथयश शेतकऱ्यांमध्ये होते. एका नामांकित कंपनीत मॅनेजर पदावरील नोकरीचा त्याग करुन सचिन यांनी शेतीची वाट धरली. वार्षिक 24 लाखांच्या नोकरीचा त्याग करून मेधपूर येथे शेतकरी म्हणून आयुष्य सुरु केले. 

शेतीविषयी काहीही कल्पना नसलेल्या सचिन यांनी पेरणी पासून काढणीपर्यंत सर्व कामे स्वत: शिकली. सचिन यांनी करार पद्धतीच्या शेतीचे नवे मॉडेल उभारले. आज जवळपास 100 हून अधिक शेतकरी कुटूंबांना आर्थिक उत्पन्नाचा नवा मार्ग गवसला आहे. वर्षाकाठी 2 कोटी रुपयांचे आर्थिक उत्पन्न सचिन आपल्या शेतीतून मिळवतात.

 3. हरीश धनदेव (Harish Dhandev)

सरकारी नोकरीमधील सुखासीन आयुष्याचा त्याग करुन स्वत:ला सिद्ध करणाऱ्या हरीश धनदेवांची गणना श्रीमंत शेतकऱ्यांमध्ये होते. राजस्थानच्या मरुभूमीत को

रफडीच्या उत्पादनाला सुरुवात केली. ऑनलाईन माध्यमातून तसेच तज्ज्ञ शेतकऱ्यांसोबत संवाद साधून हरीश यांनी कोरफड लागवडीचे तंत्रज्ञान अवगत केले. यावेळी कोरफडची मागणी केवळ स्थानिक बाजारपेठेत नसून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थान त्यांच्या लक्षात आले. केवळ सहाच महिन्यात 80 हजार झाडांवरुन 6 लाख झाडांपर्यंत पोहोचले.

हरीश यांना केवळ राजस्थानातूनच दहा क्लायंट मिळाले. मात्र, कोरफड मधील गर काढून अधिक किंमतीत विक्री करत असल्याचे त्यांना आढळून आले. तेव्हा त्यांनी स्वत: निर्मिती प्रक्रिया विकसित करून कोरफड उद्योगाला आरंभ केला. आज हरीश यांचे मासिक उत्पन्न 1-2 कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.

English Summary: the story of richest farmer in india Published on: 21 October 2021, 10:34 IST

Like this article?

Hey! I am ललिता बर्गे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters