उसाचा गळीत हंगाम होऊन १ महिना झाला आहे जे की या महिन्याच्या कालावधीत राज्यातील जवळपास १३९ साखर कारखान्यांनी आतापर्यंत १०५ लाख टन ऊस गाळला आहे तर त्यामधून ९१ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन मिळाले आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी कमी उतार असल्याचे सांगितले आहे जो की अधिकच्या पावसामुळे ऊस उत्पादनावर परिणाम झालेला आहे.राज्यातील ऊस कारखाने सुरू होण्यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती जे की या बैठकीत १५ ऑक्टोबर पासून उसाचा (sugarcane)गळीत हंगाम सुरू करा अशी परवानगी दिलेली होती. ज्या कारखान्याचे एफआरपी थकीत आहेत अशा कारखान्यांची परवानगी नाकारण्यात आलेली होती. कोल्हापूर विभागातील कारखान्यात सर्वात जास्त ऊस गाळप झाला आहे.
ऊसाची पळवापळवी झाली नाही:-
ऊस गाळपवेळी मंत्रिमंडळ बैठक झाली होती त्यामध्ये १५ ऑक्टोबर पासून गाळप सुरू करणे असे आदेश दिले होते मात्र यापूर्वी जर गाळप सुरू केले तर कारवाई होईल असे संकेत साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले होते. १५ ऑक्टोबर च्या आधी जर कारखान्यांनी गाळप सुरू करून पळवापळवी केली तर कारवाई केली जाईल असे सांगण्यात आले होते . ३ कारखान्यांनी असे केले आहे त्यामुळे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे.
एफआरपी’ एकरकमेतच अदा करावी लागणार:-
शेतकऱ्यांना एफआरपी ची रक्कम देण्यात बाबत सरकारने मधला मार्ग काढलेला आहे. ही रक्कम तीन टप्यात देण्याबाबत राज्य सरकारकडे शिफारस करण्यात आलेली होती. मात्र या निर्णयाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विरोध केला होता. एफआरपी ची रक्कम एक रकमी अदा करावी असे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितले आहे.
विनापरवाना गाळप करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई:-
एफआरपी थकीत असणाऱ्या कारखान्यांची गाळपाची परवानगी नाकारण्यात आली होती तरी काही कारखाने गाळीप चालू असल्याचे निदर्शनास आले तर ३ कारखान्यांनी वेळेआधीच गाळप सुरु केले आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई प्रक्रिया सुरू केली आहे.
Share your comments