छत्रपती संभाजीनगर
मराठवाड्यातच नव्हे तर सगळ्या भागात सध्या पावसाची कमतरता आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी चांगला पाऊस नाही. पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे, त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी आमदार अंबादास दानवे यांनी केली आहे.
अंबादास दानवे म्हणाले की, मराठवाड्यात काही ठिकाणी दुर्दैवाने भर पावसाळ्यात पाण्याचे टँकर सुरु आहेत. दुष्काळाची भयावय परिस्थित निर्माण झाली आहे. सरकारने यात लक्ष देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. तसा कार्यक्रम सरकारने शेतकऱ्यांच्या दारात सुरु कराव, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असंही दानवे म्हणाले आहेत.
पुढे ते म्हणाले की, आई जेवू घाले ना आणि बाप भीक मागू देईना, अशी स्थिती राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. शेतकऱ्यांना आतापर्यंत २५ टक्के इन्शुरन्स मिळायला पाहिजे होता. तसंच मागच्या अतिवृष्टीची देखील मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. पण सरकारकडून तसं दिसत नाही. हे सरकार शेतकऱ्यांशी असंवेदनशील आहे, असं देखील दानवे म्हणाले आहेत.
दरम्यान, राज्यात सध्या कांदा, सोयाबीन, मोसंबी, आले पिकांच्या विविध समस्या आहेत. त्याबाबत सरकार काही बोलत नाही. सरकार फक्त शासन आपल्या दारी शो करत आहे. सरकारचे विमान, हेलिकॉप्टर्स वापरायचे. ऑफिसमध्ये सरकारी अधिकारी यांना बसू द्यायचं नाही, अशी टीका देखील दानवे यांनी केली आहे.
Share your comments