नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समिती ही लाल मिरची चे मुख्य आगार असले तरी सुद्धा मराठवड्यात ज्या मिरची चा ठसका सुरू आहे तो बरबडा मिरचीचा. मागील काही वर्षांपूर्वी नायगाव तालुक्यातील बरबडा येथील मिरची चा ठसका अख्या महाराष्ट्र राज्यासह तेलंगणा ला सुद्धा लागला आहे. बरबडा मिरची ही अस्सल गावरान मिरची म्हणून ओळखली जाते. मात्र बदलत्या वातावरणामुळे मिरचीच्या झाडावर किडीचा आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याने उत्पादनात घट झालेली आहे. मात्र आता पुन्हा एकदा परिस्थिती सुधारली असल्याने मिरची बरबडा शिवारात चांगल्या प्रकारे फुललेली आहे. सध्या परिसरात मिरची ची काढणी सुरू असल्यामुळे मागणीमध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे वेगळेपण?
नांदेड जिल्ह्यातील बरबडा गावात लाल मिरची चे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते जे की ही मिरची गावरान असल्यामुळे यास जास्त मागणी आहे. फक्त महाराष्ट्र राज्यात च नाही तर तेलंगणा मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या मिरचीची चव सुद्धा वेगळीच आहे तसेच या मिरचीचे लोणचे सुद्धा तयार केले जाते. बरबडा गावातील शेतकरी शेजारी छोटया मोठ्या बाजारात मिरची विक्रीसाठी घेऊन जातात. पुन्हा एकदा बरबडा शिवारात मिरची फुललेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण झाले आहे. जे की या मिरचीला तिखटपणा आणि चवदारपणा आहे जे की हा एक वेगळाचपणा आला आहे.
हुमनी अळीच्या प्रादुर्भावामुळे अस्तित्व धोक्यात :-
सध्या वातावरणात झालेल्या बदलामुळे पिकांवर किडी रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. बरबाड परिसरातील मिरचीवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने पूर्ण पीक उध्वस्त झाले होते त्यामुळे आता लाल मिरचीचे उत्पादन भेटतेय की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र पोषक वातावरण निर्माण झाले असल्याने बरबडा परिसरात लाल मिरचीचा ठसका उठलेला आहे. सध्या या मिरची ची तोडणी सुरू असून शेतकऱ्यांना जास्त उत्पादन मिळेल अशी अशा आहे तसेच पूर्वीप्रमाणे मिरचीला मागणी वाढेल असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
बरबडा मिरचीच्या जागी तेजा मिरची :-
नांदेड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने बरबडा या लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. परंतु निसर्गाच्या अनियमितपणामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे त्यामुळे आंधरप्रदेशात असणारी गुंटूर आणि तेजा मिरचीला प्राधान्य दिले आहे. नागरिकांना या संकरित मिरचीवर आपली गरज पूर्ण करावी लागत आहे. पण आता पुन्हा एकदा पोषक वातावरण निर्माण झाल्याने बरबडा शिवारात ही लाल मिरची फुलू लागली आहे.
Share your comments