शेतकरी वर्गावर सतत संकटाची मालिका सुरूच असते त्यात भर पडते ती म्हणजे महागाई ची, शेतकरी वर्गावर अनेक वेगवेगळ्या समस्या येत असतात यामधील दुष्काळ, सुकाळ, रोगराई, पिकांना योग्य भाव न मिळणे इत्यादी अनेक कारणे आहेत.
पावसाअभावी पिके करपली:-
बऱ्यापैकी आपल्या देशातील शेती पाऊसाच्या पाण्यावर चालते. आणि महत्वाचे म्हणजे शेती ला सर्वात जास्त गरज ही पाण्याची असते. गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे परंतु आपल्या राज्यात काही असे सुद्धा जिल्हे आहेत तिथं अजिबातच पाऊस पडला नाही.
पेरणीच्या वेळेस योग्य पाऊस झाला होता परंतु ऐन हंगामाच्या काळात पाऊसाने दांडी मारल्यामुळे परभणी मधील शेतकरी वर्ग चिंतेत आहे. त्यामुळे याचा परिणाम हा नक्कीच पिकाच्या उत्पानवावर होणार आहे. हे मात्र नक्की आहे. ऐन हंगामाच्या वेळी पाऊस न पडल्याने शेतकरी वर्गाची मेहनत आणि बियाणे पूर्णपणे पाण्यात जाणार आहे शिवाय सोयाबीन, कापूस, तूर, उडीद या पिकांच्या उत्पानात मोठी घट होणार आहे.
हेही वाचा:-इडिबल कोटिंग मुळे आता फळे -भाज्या राहणार दीर्घकाळ ताज्या, आयआयटी चे नवीन संशोधन
ऐन हंगामाच्या वेळी पाऊस गायब झाल्यामुळे हाता तोंडाला आलेली पिके मोहरातच जळून खाक होत चालली आहेत. योग्य वेळी पाऊस न पडल्यामुळे रानात पिके जळून खाक होऊ लागली आहेत त्यामुळे संतप्त शेतकरी वर्गाने जळालेली पिके थेट जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून देऊन लवकरात लवकर कोरड्या दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी केली आहे. हंगामाच्या सुरवातील ओला दुष्काळ जाहीर करा म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर आता कोरडा दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी करण्याची आता वेळ आली आहे.
हेही वाचा:-महा-ऊस नोंदणी ॲप लाँच, आता घरबसल्या 200 कारखान्यावर होणार उसाची नोंदणी, वाचा सविस्तर
प्रहार जनशक्ती शेतकऱ्यांच्या पाठीशी:-
शेतकरी वर्गावर संकट ओढवले आहे. मधील काळात राज्य सरकार ने मदतीची घोषणा केली होती परंतु ती मदत शेतकरी वर्गाकडे प्रत्यक्षात पोहचलीच नाही. त्यामुळे पावसा अभावी पिके करपून गेल्यामुळे शेतकरी वर्गाची स्थिती सरकार च्या लक्ष्यात यावी म्हणून जनशक्तीच्या पदाधिकाऱ्यांनी वाळलेली पिके थेट जिल्हाधिकारी कार्यालयात फेकून दिले आहेत.
Share your comments