1. बातम्या

उसाच्या शेतात आडोसा घेऊन सुरु होता धक्कादायक प्रकार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शेतकऱ्यांच्या अनेक करामती आपण ऐकत आलो आहे. मात्र उसाच्या शेताच्या आडोशाचा फायदा घेत बिनधास्तपणे देशी दारूची भट्टी येथील शेतात सुरु होती. पुणे, इंदापूर तालुक्यामधील भोडणी लाखेवाडी या गावाच्या हद्दीत अवैध दारूभट्टीवर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे.

relief in the sugarcane field, by the police

relief in the sugarcane field, by the police

शेतकऱ्यांच्या अनेक करामती आपण ऐकत आलो आहे. मात्र उसाच्या शेताच्या आडोशाचा फायदा घेत बिनधास्तपणे देशी दारूची भट्टी येथील शेतात सुरु होती. पुणे, इंदापूर तालुक्यामधील भोडणी लाखेवाडी या गावाच्या हद्दीत अवैध दारूभट्टीवर इंदापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. मानवी देहाला अपाय करणाऱ्या गावठी बनावटीच्या देशी दारूची भट्टी या शेतात अवैधरित्या सुरु होती.

यावर कारवाई करत पोलिसांनी दारू निर्मिती करण्यासाठी आणलेला कच्चामाल व दारू बनवताना वापरले जाणारे रसायन नष्ट केले आहे. गांजाची अथवा अफूची शेती करण्यासह अनेक करामती शेतकऱ्यांच्या शेतात आढळून येत असतात. आता थेट बनावट दारूची भट्टीच उसाच्या शेतात सुरु करण्यात आली होती. याची कुणकुण इंदापूर पोलिसांना लागली होती. त्यामुळे या ठिकाणी धाड टाकून पोलिसांनी कारवाई केली.

या कारवाईत ९ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात १ दुचाकी, ३ विद्युत मोटर व ४५ पिंप याचा समावेश आहे. तसेच विजय पवार आणि भावड्या पवार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच याबाबत अधिक तपास इंदापूर पोलिस करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक तयुब मुजावर यांनी दिली. यामुळे सध्या याची चर्चा सुरु आहे.

असे प्रकार गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. तसेच शेतात गांजाची शेती केली जात आहे. याबाबत अनेकांवर कारवाई देखील करण्यात आली आहे. यामुळे पोलीस अशा व्यक्तींवर कारवाई करत आहेत. यामुळे असे प्रकार रोखण्याचे आवाहन पोलीसांवर आहे. अनेक शेतकरी थेट गांजाची लागवड करण्याची परवानगी राज्य सरकारकडे मागत आहेत.

महत्वाच्या बातम्या;
50 हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार? अजितदादांनी सांगितले 'हे' गणित...
शेतकऱ्यांना आता वीज बिलातून दिलासा, 'हे' सरकार बसवणार सोलर पॅनल..
होळी अर्थात शिमगा सणाच्या जाणून घ्याव्यात अशा विविध परंपरा, वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान...

 

English Summary: The shocking type started with a sigh of relief in the sugarcane field, by the police Published on: 17 March 2022, 11:29 IST

Like this article?

Hey! I am मनोज रामचंद्र दातखिळे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters