यंदा मुख्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली. निसर्गाच्या लहरीपणामुळे सगळ्याच पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र, उन्हाळ्यातील हंगामी पिकांनी (Seasonable Crop) शेतकऱ्यांना तारले आहे. आतापर्यंत कलिंगडला विक्रमी दर मिळाला होता आता त्याचप्रमाणे लिंबाच्या दरातही (Lemon Rate) वाढ झाली आहे.
निसर्गाच्या लहरीपणाचा फटका
अवकाळीची अवकृपा सर्वच पिकांवर राहिलेली आहे. यंदा शेतकऱ्यांनी नियोजन केले असले तरी निसर्गाच्या लहरीपणामुळे सर्व काही संपले होते. त्याचप्रमाणे लिंबू बागांचीही यामधून सुटका झालेली नाही. यंदा सर्व पिकावर निसर्गाच्या लहरीपणाचा परिणाम हा झालेलाच आहे.
लिंबाला मिळतोय 'सोन्या'चा भाव
यंदा उन्हाळ्याच्या सुरवातीला ढगाळ वातावरणामुळे लिंबाच्या मागणीवर परिणाम होणार असेच चित्र होते. पण आता परस्थिती बदलली आहे. वाढत्या उन्हामुळे लिंबाच्या दरात वाढ झाली आहे. हंगामाची सुरवात होण्यापूर्वी 20 ते 25 रुपये किलोवर असलेले लिंबू आता थेट 125 रुपये किलोंवर पोहचले आहे.
25 रुपये किलो असणारे लिंबू आज नगावर विकावे लागणार का अशी परस्थिती आहे. ठोक बाजारात 125 रुपये किलोचा दर मिळत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. शेतकरी समाधानी आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
शेतकऱ्यांची काळजीच मिटली; जनावरांचा विमा काढण्यासाठी सरकारकडून 70 टक्के अनुदान मिळणार
नुकसान झाले तरी हार मानली नाही; दोन महिन्यात शेतकरी झाला मालामाल
Summer Plants: उष्णतेमुळे त्रास होतोय, घराला थंड ठेवायचे आहे तर लावा 'ही' झाडे
Share your comments