
Russia-Ukraine war
रशियाने युक्रेन विरोधात (Russia-Ukraine war) लष्करी कारवाई केली आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर रशियाने गुरुवारी युक्रेनवर हल्ला केला आहे. रशियाने क्षेपणास्त्र आणि इतर शस्त्रांच्या मदतीने हल्ला केला आहे. या युद्धामुळे गेल्या 24 तासांत आंतरराष्ट्रीय घडामोडींमध्ये अनेक बदल झाले आहेत.
"या" वस्तू होणार महाग
रशिया-युक्रेन युद्धामुळे सामन्यांच्या चिंतेत भर पडली आहे. युद्धामुळे महागाईचा भडका उडणार आहे. रशिया-युक्रेन संघर्षामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढण्याची शक्यता आहे. कारण दोघेही परिष्कृत सूर्यफुलाचे मोठे निर्यातदार आहेत. युद्ध दीर्घकाळ चालले तर सूर्यफूल तेलाची कमतरता भासू शकते. गेल्या अनेक वर्षांपासून देश खाद्यतेलाच्या बाबतीत आयातीवर अवलंबून आहे. एकूण वापरापैकी ६५ टक्के खाद्यतेल आयात करावे लागते. त्यामुळे देशाचा महसूल प्रचंड असून, त्याचा फटका सरकारला सहन करावा लागतो.
भारतात महागाई वाढणार
युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. पेट्रोल-डिझेलची किंमत लगेच वाढण्याची शक्यता आहे. भाजीपाला आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरांवरही थेट परिणाम होणार आहे. दीड महिन्यांपासून पेट्रोलचे दर वाढलेले नाहीत. पण, दरम्यानच्या काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाने 15-17 टक्क्यांची उसळी घेतली आहे. रशिया आणि यूक्रेन वादामुळे सोने, चांदी पासू कच्च्या तेलाच्या भावात मोठी वाढ नोंदविली गेली आहे.
Share your comments