1. बातम्या

पांग्री उगले येथे रस्ता गेला चोरीला.

खेडे स्वयंपूर्ण व्हायला पाहिजेत हे वाक्य प्रत्येकाच्या भाषणात असतेच असते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
पांग्री उगले येथे रस्ता गेला चोरीला.

पांग्री उगले येथे रस्ता गेला चोरीला.

परंतु खेड्यांचा विकास होण्याकरिता प्रामुख्याने गावचे सरपंच , ग्रामसेवक हे कारणीभूत असतात. खेडी स्वयंपूर्ण होण्यासाठी चांगले रस्ते, सांडपाण्याचे व्यवस्थापन, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची उत्तम सोय, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र  अश्या अनेक गोष्टी आहेत. मात्र पांगरी उगले या गावांमध्ये सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन  नाही, प्राथमिक आरोग्य केंद्र फक्त दिसण्याकरिता च आहे गावातील रुग्णांना किनगाव राजा येथे जाऊन उपचार घ्यावे लागतात.

आणि रस्त्यांची अत्यंत दुर्दशा झाली असून गेली कित्येक दिवसापासून गावातील नागरिक या खराब झालेल्या रस्त्यावरून वावरत आहे. याचा मोठा त्रास त्यांना सहन करावा लागत आहे भारतास स्वातंत्र्य मिळून कित्येक वर्षे झाली मात्र अजूनही ग्रामीण रस्त्यांच्या विकासाकडे पाहिले जात नाही. हीच गावातली दुर्दशा लक्षात घेऊन गावातील युवक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास उगले यांनी एक पाऊल उचलले आहे.

.पं.पांग्री उगले ने २५/१५ अंतर्गत रस्त्यांचे आतापर्यंत कोणतेही काम केलेले नसुन शाखा अभियंता श्री मेहेत्रे यांनी कामाचे मुल्यांकन काम न पाहता केले असुन कामाचे पुर्णत्वाचे प्रमाणपत्र देखील काम न पाहता करण्यात आले आहे. सरपंच/सचिव स्वात: कंत्राटदार असुन काम न करता कामा चा निधी स्वात: च्या फायद्या साठी वापरला असुन निधीचा भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात केला आहे. काम न केल्यामुळे गावाचे आर्थिक नुकसान देखील झाले आहे.

तरी सदर प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कामाची चौकशी करण्यात येऊन नियमबाह्य रक्कम हडप करण्याऱ्या सरपंच, सचिव यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येऊन काढलेली रक्कम शासनखाती जमा करावी.

तसेच काम न पाहता मुल्यांकन दिल्याने शाखा अभियंता यांच्यावर देखील कठोर कारवाई करुन सर्व गावकऱ्यांना न्याय मिळावा ही विनंती. अन्यथा आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या स्टाईल मध्ये आंदोलन करु असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष विकास उगले यांनी सांगितले आहे.

प्रतिनिधि - गोपाल उगले

MO- 9503537577

English Summary: The road at Pangri Ugale was stolen (2) Published on: 24 November 2021, 08:35 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters