हळद संशोधन आणि प्रक्रिया धोरण अभ्यास समितीच्या बैठकीत तयार करण्यात आलेला हळद संशोधन प्रक्रिया धोरण अभ्यासाचा मसुदा मंजुरी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला.
मंत्रिमंडळामध्ये यासाठीची बैठकही राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर सविस्तरपणे चर्चा होऊन लवकरच हळद धोरणाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती या अभ्यास समितीचे अध्यक्ष आणि खासदार हेमंत पाटील यांनी दिली. या समितीने जो काही अहवाल तयार केला आहे तो कृषी विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध करून देण्याच्या सूचना देखील कृषी मंत्री दादा भुसे यांनी केले आहेत हळद उत्पादनाच्या बाबतीत भारताचा विचार केला तर भारत हा हळद उत्पादनामध्ये प्रमुख आणि हळद उत्पादनामध्ये देखील जगात अव्वल आहे
भारतामध्ये प्रामुख्याने तामिळनाडू, तेलंगणा, छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र मध्ये प्रामुख्याने हळदीचे उत्पादन घेतले जाते. दर भारतामध्ये हळद पिकाखाली लागवड क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्र हे देशातील पहिल्या क्रमांकाचे राज्य आहे. तर हिंगोली जिल्हा महाराष्ट्रात हळद उत्पादनाच्या बाबतीत अव्वलस्थानी आहे असे पाटील यांनी सांगितले.. या समितीच्या आतापर्यंत विविध बैठका पार पडले असून यामध्ये आधीचे नवीन संकरित बियाणे, हळद पिकासाठी विम्याची तरतूद, हळद पिकाच्या खत आणि पाण्याचे योग्य नियोजन, अवजारे, हळद निर्यात धोरण, हळदीचे उत्पादन वाढविण्यासाठी सेंद्रिय पद्धतीचा वापर तसेच हळदी साठी लागणारे कृषी यांत्रिकीकरण, हळद काढणीनंतर व्यवस्थापन इत्यादी विषयांवर चर्चा झाल्याचेही खासदार पाटील यांनी म्हटले.
या आयोजित केलेल्या बैठकीत राज्यातील फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे,आमदार अमित झनक, आमदार महेश शिंदे तसेच कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले आणि कृषी आयुक्त धीरजकुमार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
Share your comments