नवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांचे दर वधारणार

29 March 2021 10:34 AM By: KJ Maharashtra
रासायनिक खतांचे दर वधारणार

रासायनिक खतांचे दर वधारणार

नवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांच्या दर गगनाला पोहोचण्याचे संकेत खत कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहेत. एक एप्रिल पासून रासायनिक खतांचे दर वाढतील अशी शक्यता आहे. डीएपी खताचा शॉर्ट आतापासून दिसत आहे. 

डीएपी या रासायनिक खताचे दर हे गोणीला 550 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकटा खरीप हंगामात 1 लाख 89 हजार टन खत जिल्ह्यासाठी लागते. या परिस्थितीत जर खतांचे दर वाढले तर कमीतकमी 50 कोटीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.

 

सध्या तर उन्हाळी हंगाम संपत आला आहे तसेच साखर कारखान्यांचा हंगाम देखील संपत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते आणि ऊस वाढीसाठी स्फुरद  घटक महत्त्वाचा असतो. 

 

हा घटक डीएपी मध्ये असल्याने डीएपी खताला मागणी जास्त असते.. डीपी चा तुटवडा आधीच झाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात  करताना दिसत आहे.

financial year chemical fertilizers नवीन आर्थिक वर्ष रासायनिक खतांचे दर
English Summary: The rates of chemical fertilizers will increase in the new financial year

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.