नवीन आर्थिक वर्षात रासायनिक खतांच्या दर गगनाला पोहोचण्याचे संकेत खत कंपन्यांनी विक्रेत्यांना दिले आहेत. एक एप्रिल पासून रासायनिक खतांचे दर वाढतील अशी शक्यता आहे. डीएपी खताचा शॉर्ट आतापासून दिसत आहे.
डीएपी या रासायनिक खताचे दर हे गोणीला 550 रुपये पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. जर कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर एकटा खरीप हंगामात 1 लाख 89 हजार टन खत जिल्ह्यासाठी लागते. या परिस्थितीत जर खतांचे दर वाढले तर कमीतकमी 50 कोटीचा फटका शेतकऱ्यांना बसणार आहे.
सध्या तर उन्हाळी हंगाम संपत आला आहे तसेच साखर कारखान्यांचा हंगाम देखील संपत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस लागवड मोठ्या प्रमाणात होत असते आणि ऊस वाढीसाठी स्फुरद घटक महत्त्वाचा असतो.
हा घटक डीएपी मध्ये असल्याने डीएपी खताला मागणी जास्त असते.. डीपी चा तुटवडा आधीच झाला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यामुळे शेतकरी युरियाची मागणी मोठ्या प्रमाणात करताना दिसत आहे.
Share your comments