कांद्याचे दर हे लहरीपणासारखे बदलत आहेत. यंदा सुरुवातीला कांद्याला चांगला दर मिळाला. आता मात्र कांद्याच्या दरात खूपच घसरण झाली आहे. उन्हाळी कांद्याची आवक सुरू होताच भाव कमी झाले. त्यामुळे आता शेतकरी संकटात सापडला आहे. कांदा उत्पादकांना धीर देण्यासाठी आता कांदा उत्पादक संघटना सरसावली आहे.
जनआंदोलन उभारणार
कांद्याच्या दरातील अनियमिततेचा फटका ग्राहकांपेक्षा शेतकऱ्यांना जास्त बसत आहे. एकीकडे वाढता उत्पादन खर्च आणि दुसरीकडे घसरलेले भाव असे दुहेरी संकट शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची दुहेरी कोंडी होत आहे. कांद्याला किमान भाव मिळावा यासाठी कांदा उत्पादक संघटनेतर्फे जनआंदोलन उभारण्यात येत आहे.
Skymet : वेधशाळेचा अंदाज आला रे; महाराष्ट्रात असा असणार मान्सून...
लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा मार्केटसाठी प्रसिद्ध आहे. या बाजार समितीत देशातच नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक कांद्याची उलाढाल होते. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघाचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट दिली.
महत्त्वाच्या बातम्या :
Milk FRP : दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; नव्या संघर्षाचा आरंभ
जनावरांच्या पोटातील जंत किडे निघून जातील; जाणून घ्या काय आहे 'हे' औषध
बाजार समिती प्रशासन, व्यापारी व शेतकऱ्यांशी संवाद साधून कांद्याचे भाव कसे वाढवता येतील याबाबत चर्चा केली. आता कांदा दराबाबत काय तोडगा निघतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
थकीत ऊस बिलासाठी शेतकरी आक्रमक; थेट कारखानाच केला बंद
ऊस तोडणीसाठी शेतकऱ्यांनी दागिने गहाण ठेवून पैसे दिले, पैसे परत द्या नाहीतर साखर कारखान्यावर मोर्चा, स्वाभिमानीचा इशारा
Share your comments