यावर्षीचा गाळप हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे असे असताना या वर्षी किती उसाचे गाळप झाले यापेक्षा अजून किती ऊस फडात शिल्लक आहे यावरच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा बघायला मिळत आहे. यावर्षी गाळप हंगाम चक्क सात महिने सुरू आहे त्यामुळे ही घटना इतिहासात पहिल्यांदाच होत असल्याचे सांगितले जात आहे.
गाळप हंगाम अधिक दिवस सुरु राहून देखील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवरच आहे. हाती आलेल्या माहितीनुसार एकट्या सांगली जिल्ह्यात अजूनही 25 हजार हेक्टर क्षेत्रावर पाऊस फडात बघायला मिळत आहे. एकीकडे, ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस फडात उभा आहे तर दुसरीकडे कारखान्यांचे दरवाजे बंद होत असून ऊस तोडणी मजूर आपल्या गावी मार्गस्थ होत असताना बघायला मिळत आहेत.
यामुळे सर्व ऊस उत्पादक शेतकर्यांचा ऊस गाळप झाल्याशिवाय साखर कारखान्यांची धुराडी जर बंद केली तर साखर कारखानदार संचालक यांच्या घरासमोर आंदोलन उभारू असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. आतापर्यंत अतिरिक्त उसाचा प्रश्न मराठवाड्यात बघायला मिळत होता पण आता पश्चिम महाराष्ट्रातही अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. एकंदरीत हंगामाच्या शेवटी देखील अतिरिक्त उसाचा प्रश्न कायम असून यावर राजकारण अजूनच चिघळू शकते असे चित्र बघायला मिळत आहे.
यावर्षी मुबलक पाण्याचा साठा उपलब्ध असल्याने तसेच पोषक वातावरण लाभल्याने उसाच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. सांगली जिल्ह्यातही कधी नव्हे ती उसाच्या क्षेत्रात वाढ नमूद करण्यात आली आहे. या हंगामात एकट्या सांगली जिल्ह्यात सव्वा लाख हेक्टर क्षेत्रावर उसाची लागवड बघायला मिळाली. गाळप हंगाम आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असताना सांगली जिल्ह्यात केवळ एक लाख हेक्टर क्षेत्राचे ऊस गाळप झाले आहे. यामुळे अजूनही 25 हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस फडात उभा आहे हे स्पष्ट होते.
या हंगामात मराठवाड्यात उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आणि यामुळे अतिरिक्त उसाचा प्रश्न ऐरणीवर आला. केवळ उसाच्या क्षेत्रात वाढ झाली म्हणूनच अतिरिक्त उसाचा प्रश्न उभा राहिला नसून यामागे कारखानदारांची भूमिका देखील संशयास्पद आहे. सांगली जिल्ह्यात पाच साखर कारखाने संपूर्ण गाळप हंगाम भर बंद राहिले. यामुळे एकीकडे उसाच्या क्षेत्रात वाढ झाली तर दुसरीकडे पाच साखर कारखाने बंद राहिल्याने अतिरिक्त उसाचे गाळप शक्य झाले नाही. साखर कारखान्यांनी अपेक्षित ऊस गाळप पूर्ण केल्यामुळे आता आवराआवर सुरू केली आहे.
मात्र शेतकऱ्यांची परिस्थिती लक्षात घेता हा गाळप हंगाम अजून काही काळ चालू राहू द्यावा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आता लावून धरली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मते, जे साखर कारखाने बंद केले जातील त्यांच्या अध्यक्ष यांच्या घरासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल. एकंदरीत गाळप हंगाम आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर असतानाच अतिरिक्त उसाचा प्रश्न चिघळणार म्हणजेच चिघळणार.
संबंधित बातम्या:-
Share your comments