उत्पादन वाढीसाठी शेतकरी नेहमी कोणत्या न कोणत्या उपाययोजना करत असते जे की काळाच्या बदलात शेतकरी जास्तीत जास्त उत्पादनावर भर देत आहे. परभणी जिल्ह्यामध्ये रब्बी व खरीप हंगामात सुमारे 1 लाख ७२ हजार मेट्रिक टन रासायनिक खताचा वापर झाला आहे. ही आकडेवारी फक्त एकाच जिल्ह्याची आहे जे की पूर्ण देशात वर्षात ३०० लाख टन रासायनिक खताची गरज असते. रासायनिक खतामुळे जरी उत्पादनात भर पडत असली तरी शेतकऱ्यांनी शेतजमिनीचा विचार करणे गरजेचे आहे. कारण रासायनिक खताच्या अधिक वापरामुळे जमिनीचे आरोग्य धोकात असते जे की उत्पादकतेवर परिणाम होतो. शेतकऱ्यांनी मधला मार्ग शोधावा असे कृषी विभागाने सांगितले आहे.
खरीप हंगामात अधिकचा वापर :-
उत्पादनाच्या दृष्टीने खरीप हंगाम महत्वाचा मानला जातो मात्र उत्पादन वाढवण्यासाठी शेतकरी जास्त रासायनिक खताचा वापर करत आहेत. कमी काळात नगदी पिकाचे उत्पन्न पदरी पाडून घेण्यासाठी रासायनिक खतांचा जास्त वापर होत आहे. अतिरिक्त रासायनिक खत हे मानवी शरीरासाठी घातक आहे म्हणून सेंद्रिय शेतीचा उगम जास्तीत जास्त व्हावा यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतलेला आहे. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन या दोन मुख्य पिकांना रासायनिक खते जास्त वापरली जातात असे कृषी विभागास दिसले आहे.
रासायनिक खतावर काय आहे उपाय?
शेतकऱ्यांनी टप्याटप्यात का होईना पण सेंद्रिय शेतीचा स्वीकार करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी सेंद्रिय खताबरोबरच रासायनिक खतांची पिकांना मात्रा दिली तर पिकाच्या उत्पादनात भर पडणार आहे तसेच शेतजमिनीचा पोत सुद्धा सुधारणार आहे. सेंद्रिय कर्ब वापरून हे शक्य होणार असल्याचे सांगितले जात आहे मात्र यासाठी कृषी विभागाकडून गांडूळ खत, नाडेप टाके बांधकाम यासाठी अनुदान दिले जात आहे. तसेच आता रासायनिक खताचे दर वाढणार असून शेतकऱ्यांनी रासायनिक खताला सेंद्रिय खताची जोड द्यावी म्हणजे खर्च देखील कमी होणार आहे आणि उत्पादनात देखील।वाढ होणार असल्याचे कृषितज्ञांनी सांगितले आहे.
आगामी खरिपात खत दरवाढीचे संकट :-
भारत देशात रासायनिक खतांचा तुटवडा कायमचा आहे आणि यामध्येच रशिया आणि युक्रेन युद्धाचा परिणाम खत आयातीवर झाला आहे. देशात खताचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय केंद्राने घेतला असून दरामध्ये वाढ होणे साहजिकच आहे. शेतकऱ्यांनी स्थानिक पातळीवर रासायनिक खताला सेंद्रिय खताची जोड देणे गरजचे आहे. जे की यामुळे जमिनीचे आरोग्य टिकून राहणार आहे आणि सुपीकता देखील वाढणार आहे.
Share your comments