भारतात भाजीपाला पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते, आणि आपल्या देशात भाजीपाल्याची मागणी ही वर्षभर कायम असते. असे असले तरी आपल्या भारताचा मागणी पुरवठा पूर्ण करून देखील खुप मोठ्या प्रमाणात भाजीपाला निर्यातीसाठी उरतो. आणि शेतकरी बांधव भाजीपाला पिकातून चांगले उत्पन्न मिळवतात. भाजीपाला तसेच फळ लागवडित आणि उत्पादनात भारताचा वैश्विक पटलावर खुप मोठा दबदबा आहे. फळ उत्पादनात तर चीन नंतर भारताचाच नंबर लागतो. केंद्रीय स्तरावरील राष्ट्रीय फलोत्पादन मंडळाने (National Horticulture Board) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये भारतात 99.07 दशलक्ष मेट्रिक टन फळे आणि 191.77 दशलक्ष मेट्रिक टन भाज्यांचे उत्पादन झाले.
भारतात 6.66 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे निव्वळ फळ लागवडीखाली आहे तर 10.35 दशलक्ष हेक्टर क्षेत्र हे भाजीपाला पिकांच्या लागवडीखाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या (Food and Agriculture Organization) आकडेवारीनुसार, बटाटा, कांदा, फुलकोबी, वांगी आणि कोबी उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. भाजीपाला आणि फळ लागवडीतून भारताचे शेतकरी बक्कळ कमाई करत आहेत आणि ही आकडेवारी देखील भाजीपाला व फळ उत्पादनातील भारताचे महत्व अधोरेखित करत आहे.
2020 - 2021 ह्या वर्षातील एकूण निर्यात…
भारतात फळांची लागवड ही लक्षणीय आहे. फळांमध्ये, फक्त आंब्याच्या उत्पादनाचा जर विचार केला तर भारत आंब्याच्या उत्पादनात शीर्ष स्थानी विराजमान आहे. आंब्या व्यतिरिक्त पपई आणि केळीच्या उत्पादनात देखील भारत टॉपर्सच्या यादीत आहे, केळीच्या उत्पादनात महाराष्ट्राचा खुप मोठा वाटा आहे तसेच महाराष्ट्रातील खान्देश प्रांतातील जळगाव जिल्ह्याचा केळी उत्पादनात खुप मोठा सिंहाचा वाटा आहे एवढेच नाही तर जळगाव जिल्ह्यातील केळीला जिआय टॅग देखील देण्यात आला आहे.
ह्यावरून समजते की, केळीचे महाराष्ट्रात बंपर उत्पादन घेतले जाते. भारताकडे भाजीपाला निर्यातीची प्रचंड क्षमता आहे कारण भाजीपाला पिकाचे भारतात प्रचंड उत्पादन घेतले जाते आणि भारताला लागणारा भाजीपालाची मागणी पूर्ण करून देखील भारताकडे निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात फळे व भाजीपाला शिल्लक राहतो. सन 2020-21 मध्ये भारतातून फळे आणि भाज्यांची निर्यात 9,940.95 कोटी रुपयांची एवढी बक्कळ होती. ह्यामध्ये केवळ भाज्यांची निर्यात 4969.73 कोटी रुपयाची होती आणि फळांची निर्यात 4971.22 कोटी रुपये एवढी होती. यामध्ये द्राक्षे, डाळिंब, केळी, आंबा आणि संत्र्याची निर्यात सर्वाधिक झाली.
भाजीपाला निर्यात कशी सुरू करावी..
शेती हा भारतातील एक प्रमुख व्यवसाय आहे त्यामुळेच भारताला कृषिप्रधान देशाचा तमगा देखील प्राप्त आहे. शेती मध्ये भारत अजूनही पूर्ण विकसित नाहीय पण शेतीच्या क्षेत्रात भारत मोठ्या प्रमाणात प्रगती करताना दिसत आहे. भारतातील भाजीपाल्याला जगभरातून चांगली मागणी मिळत आहे. कारण आपल्या भाजीपालांचा दर्जा हा इतर देशांच्या तुलनेत उत्तम आहे तसेच आपल्याकडे असलेला सागरी मार्ग हा ह्या व्यवसायासाठी एक महत्वाचा पॉईंट ठरत आहे. मित्रांनो जर आपणांसही भाजीपाला निर्यात करायचा असेल तर, सर्व्यात आधी तुम्हाला DGFT मध्ये नोंदणी करावी लागेल जिथे तुम्हाला 10 अंकी कोड दिला जाईल. याशिवाय, ANF2A फॉर्म स्वतंत्रपणे सबमिट करावा लागेल. त्यानंतर पॅन कार्ड, 1000 रुपये आणि बँक तपशील व बँकरचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. यानंतर, निर्यात प्रोत्साहन परिषद आणि कमोडिटी बोर्डाकडे नोंदणी करावी लागते.
पेपरवर्क पूर्ण केल्यानंतर, तुम्ही आपल्या निर्यातीच्या व्यवसायासाठी ऑफिस उघडू शकतात किंवा ऑनलाइन ह्या कामाची/व्यवसायाची सुरवात करू शकता. यानंतर, आपण पुरवठादारांशी संपर्क साधून आपला व्यवसाय सुरू करू शकता. भाजीपाला निर्यातीचा खुप मोठा व्यवसाय आहे आणि ह्याची मागणी ही वर्षभर असते त्यामुळे ह्या व्यवसायला भविष्यात देखील खुप मोठा स्कोप आहे व युवा उद्योजक तसेच शेतकरी बांधव ह्या व्यवसायातून चांगली कमाई करू शकतात.
Source TV9 Bharatvarsh
Share your comments