यावर्षी भारताने साखर निर्यातीवर बंधन आणली आणि आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या दरात (Sugar Rate) वाढ झाली. यामुळे याचा इतर गोष्टींवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच सरकारने इथेनाॅल धोरण राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे भारताची साखर निर्यात (Sugar Export) कमीच राहू शकते. पण यामुळे जागतिक बाजारात साखरेचे भाव वाढू शकतात, असा निष्कर्ष अभ्यासातून पुढे आला आहे. यामुळे याकडे लक्ष लागले आहे.
जागतिक पातळीवर साखर उत्पादनात भारताचे स्थान महत्वाचे आहे. भारताची स्वतःचीच बाजारपेठ खूप मोठी आहे. तरीही भारत साखर निर्यातीत ब्राझीलनंतर दुसऱ्या स्थानावर आहे.
४ हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरणाचा लाभ, शेतकऱ्यांना होतोय फायदा...
पण भारताने इथेनाॅल उत्पादन आणि वापर वाढविण्याचा निर्णय घेतला. कार्बन उत्सर्जनात घट करण्याचे भारताचे उद्दीष्ट आहे. पण या सर्व उद्दीष्ट साध्या करताना भारताच्या साखर निर्यातीवर परिणाम होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.
काही वर्षांपासून भारत साखर निर्यातीत दुसऱ्या स्थानावर आला आहे. पण सरकारच्या या धोरणामुळे जागतिक साखर निर्यातीत भारताचा वाटा खूपच कमी राहू शकतो. आता देशातील जास्त कारखान्यांनी इथेनाॅल निर्मिती प्लांट्स सुरु केल्यास जास्तीत जास्त ऊस इथेनाॅल निर्मितीसाठी जाईल.
35 रुपयांची घोषणा फक्त कागदावरच? गाईच्या दूधदरात घसरण सुरूच...
त्यामुळे साखर उत्पादन कमी राहू शकते. भारतात इथेनाॅल निर्मितीची क्षमता वाढीचे काम जोरात सुरु आहे. सरकारच्या धोरणामुळे जागतिक साखर निर्यातीत भारताचा वाटा खूपच कमी राहू शकतो.
कर्नाटकचे पाणी महाराष्ट्राला देऊ पण... ; कर्नाटकच्या मंत्र्याची महाराष्ट्रासोबत कराराची तयारी
टोमॅटोवर मोठी ऑफर! दिल्लीत टोमॅटोची किंमत 200 रुपये किलोपर्यंत, ऑनलाइन साइट्सवर फक्त 100 रुपये किलोने विक्री
अडीच कोटी मधमाशांना किटक नाशक घातल्याने मृत्यू, धक्कादायक प्रकार आला समोर...
Share your comments