सध्या कोथिंबिरीचे भाव घसरल्याने शेतकरी हातबल झाल्याचे पहायला मिळत आहे. हवेली तालुक्यातील भवरापूर येथील प्रगतशील शेतकऱ्याने दोन एकरातील कोथिंबीर पिकावर रोटावेटर ट्रॅक्टर फिरवून पीक मोडीत काढल्याचे समोर आले आहे. यामुळे सध्या शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे.
उसाचे उत्पन्न घटल्यामुळे त्यांनी तो खोडा ऊस मोडल्यानंतर कोथिंबिरीची निवड केली. कोथिंबिरीचे भाव गगनाला भिडल्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी कोथिंबीर पीक घेतले. कोथिंबीर पिक घेण्यासाठी शेताची नांगरणी, मशागत करून कमी दिवसात जास्त उत्पन्न मिळेल म्हणून धने पेरले.
सुरुवातीला ४ हजार रुपये किमतीचे दोन पोते रासायनिक खत शेतात टाकले. मात्र त्यांच्या पदरी काहीच पडले नाही. शरद काळूराम चौधरी असे त्या शेतकऱ्यांचे नाव असून त्यांनी कोथिंबिरीचे दर घसरल्यामुळे लागवडीसाठी झालेला खर्चही निघणे अवघड झाले आहे.
उन्हाळ्यात नाकातून होणारा रक्तस्राव टाळा
यामुळे किमान शेतात खत होईल, या उद्देशाने कोथिंबीरीच्या पिकावर रोटावेटर फिरवला आहे. त्यांनी दोन एकर कोथिंबीर ही व्यापाऱ्याला पन्नास हजार रुपयांना दिली. मात्र कांद्याचे जसे बाजार पडले तसेच कोथिंबीरची अवस्था झाली.
अखेर कांदा उत्पादक शेतकऱ्यांबाबत सरकारला आली जाग! मुख्यमंत्री शिंदेंची विधानसभेत मोठी घोषणा
व्यापारी येईल या अशाने वाट पाहिली, परंतु व्यापारी काय आलाच नाही. मग थेट शेतात नांगर घालून कोथिंबीर जागेवर शेतात काढून टाकली. झालेला खर्चही वसूल झाला नाही. यामुळे त्यांना मोठा तोटा सहन करावा लागला आहे.
केळीचे दर अजून वाढणार! बाजारपेठेत केळीची मागणी वाढल्यामुळे शेतकरी वर्ग आनंदात..
किसान सभेचे लाल वादळ मुंबईत धडकणार! शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आक्रमक
एरंडीची लागवड आहे खूपच फायदेशीर, दुर्मिळ होत असताना मिळेल फायदा
Share your comments