नाशिक येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ११ ऑगस्ट ला २७० क्विंटल केळीची(banana) आवक झालेली होती त्यामध्ये केळीला प्रति क्विंटल ८०० रुपये ते १५०० रुपये असा भाव मिळाला सर्वसाधारण प्रति क्विंटल १२५० रुपये असा दर भेटला अशी माहिती बाजार समितीने दिली. १० ऑगस्ट ला २१० क्विंटल केळीची आवक झालेली होती त्यामध्ये केळीला प्रति क्विंटल ८०० रुपये ते १५०० रुपये असा भाव मिळाला सर्वसाधारण प्रति क्विंटल १२५० रुपये असा दर भेटला. ९ तारखेला केळीची आवक २८० क्विंटल झाली तर प्रति क्विंटल ८५० ते १५०० रुपये भाव मिळाला तर सरासरी १२५० रुपये भाव मिळाला.
परभणीत प्रतिक्विंटलला १००० ते १२०० रुपये:
८ तारखेला बाजार बंद असल्याने फळांची आवक झाली नाही. ७ ऑगस्ट ला १६० क्विंटल केळीची आवक झालेली होती त्यामध्ये केळीला प्रति क्विंटल ८०० रुपये ते १२५० रुपये असा भाव मिळाला सर्वसाधारण प्रति क्विंटल १००० रुपये असा दर भेटला. ६ ऑगस्ट ला १७० क्विंटल केळीची आवक झालेली होती त्यामध्ये केळीला प्रति क्विंटल १००० रुपये ते १५०० रुपये असा भाव मिळाला सर्वसाधारण प्रति क्विंटल १२५० रुपये असा दर भेटला. ५ तारखेला केळीची आवक झाली नाही.परभणी जिल्ह्यातील शेतकरी केळी ची विक्री मार्केट ला न जाता शेतातून च करतात त्यामुळे आवक कमी झाली. सध्या प्रति क्विंटल १००० ते १२०० रुपये भाव भेटत आहेत तर सरासरी भाव ११०० रुपये भेटत आहे. नांदेड मधील अर्धापुर येथील व्यापारी वर्ग शेतात जाऊनच केळी ची आवक करतात. दोन दिवसाआड ३० - ४० प्रति क्विंटल केळी ची आवक होते तर १२ तारखेला प्रति डझन ३० ते ४० रुपये असा भाव भेटला आहे. गेल्या महिन्यापासून प्रति क्विंटल १००० ते १२०० रुपये केळीचा भाव आहे.
हेही वाचा:औषधी वनस्पतींच्या लागवडीसाठी केंद्र सरकारचा हजार कोटी रुपयांचा मेगा प्लॅन
नांदेडला प्रतिक्विंटलला ११०० ते १३०० रुपये:
नांदेड मधील अर्धापुर बाजारात रोज २ ते ३ हजार टन केळीची आवक होत असते, ही केळी आठ ते दहा देशांमध्ये जातात. १२ तारखेला केळी ला प्रति क्विंटल ११०० ते १३०० रुपये भाव मिळाला.अकोला जिल्ह्यामध्ये केळीला १२ तारखेला पांढरी बोर्डानुसार १०५० रुपये भाव मिळाला आहे जे की मागील काही दिवसांपूर्वी १०२५ रुपये भाव होता मात्र २५ रुपयांची वाढ झालेली दिसून येत आहे. मागील वर्षी ज्यांनी केळी लागवड केली आहे त्यांनी अत्ता केळी मार्केट मध्ये लावून १०२५ रुपये प्रति क्विंटल ने भाव भेटत आहे.
नगरमधील दादा पाटील कृषी उत्पन्न बाजार समतीमध्ये केळीला प्रति क्विंटल ६०० ते ७०० रुपये भाव मिळाला तर सरासरी भाव ६५० रुपये ने भेटला. दर दिवसाला ६ ते ७ क्विंटल केळी ची आवक होते. १० ऑगस्ट रोजी ७ क्विंटल केळी ची आवक झाली होती त्यास ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर सरासरी ६५० रुपये भाव मिळाला.९ ऑगस्ट रोजी ५ क्विंटल केळी ची आवक झाली होती त्यास ६०० ते ७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर सरासरी ६५० रुपये भाव मिळाला. ५ ऑगस्ट रोजी ८ क्विंटल केळी ची आवक झाली होती त्यास ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर सरासरी ७०० रुपये भाव मिळाला. ३ ऑगस्ट रोजी ५ क्विंटल केळी ची आवक झाली होती त्यास ७०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला तर सरासरी ७५० रुपये भाव मिळाला. अशी महिती बाजार समितीने दिली.
Share your comments