केळी प्रतिक्विंटल २५०० ते ३००० रुपये दराने विकली जात आहेत. सप्टेंबरप्रमाणेच ऑक्टोबरमध्येही केळीला चांगला दर मिळेल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. यामुळे सध्या शेतकरी आनंदात आहेत. नांदेड जिल्ह्यातील केळीला हा दर मिळत आहे.
मागील वर्षापासून केळीला चांगला दर मिळत आहे. सध्या कमी प्रमाणात शेतकऱ्यांची केळी काढणीला आली आहेत. यामुळे आवक कमी झाल्याचा परिणाम दरावर जाणवून येत आहे. नैसर्गिक आपत्तींचा केळीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.
केळीवर सीएमवी वायरस, युरेनिया रुठ रॉट यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाला. यामुळे उत्पादनात मोठी घट दिसून येत आहे. परिणामी केळीची लागवड मागच्या वर्षी बऱ्याच प्रमाणात कमी झाली होती.
आगामी सणांमुळे उत्तर भारतात केळीची मागणी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर, मुदखेड, भोकर आणि नांदेड तालुक्यांत केळीचे पीक घेतले जाते.
दरम्यान, भारतीय केळीची मागणी इराण, इराक, कतार, दुबई, ओमान या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी भारतातील केळी उत्पादकांना यावर्षी अडीच हजार ते तीन हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहेत.
शेती महामंडळाचे प्रश्न तातडीने सोडवणार, विखे पाटलांचा मोठा निर्णय
निर्यातीसाठी इक्वेडोरची केळी आवक कमी प्रमाणात होत आहे. यावर्षी झालेल्या गारपीट, वादळीवारे व हवामान बदल यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा केळीला मोठ्या प्रमाणावर फटका बसला.
जयहिंद लोक चळवळ संस्थेच्या वतीने कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या शेतकऱ्यांचा सन्मान
Share your comments