1. बातम्या

बैल उधळले मात्र तिने वेसण सोडली नाही, बैलगाडा जुंपणाऱ्या रणरागिणीचे राज्यात होतय कौतुक..

दहावीत शिकणाऱ्या दीक्षाने बैलगाडा जुंपला. हे करीत असताना शक्तिशाली बैल अगदी आक्रमकपणे उधळला होता. मात्र ती मागे सरली नाही. यामुळे तिच्या या विडिओवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे

निंबाळकर ओंकार रमेश
निंबाळकर ओंकार रमेश
she did not let go of the oxen

she did not let go of the oxen

काही दिवसांपूर्वीच बैलगाडा शर्यती सुरु करण्याबाबत निर्णय न्यायालयाने दिला. यामुळे राज्यात एकच जल्लोष करण्यात आला. अनेक ठिकाणी गुलालाची उधळत करत पेढे वाटत आनंद साजरा केला. अनेक दिवसांपासून हा शेतकऱ्यांचा संघर्ष सुरु होता. आता अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आनंदात आहे. यामध्ये शक्यतो पुरुषच सहभागी होतात, असे असताना आता बैलगाडा जुंपणाऱ्या एका रणरागिणीचा विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ बघून अनेकांनी या तरुणीचे कौतुक केले आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातल्या उंचखडक यात्रेत दीक्षा उर्फ श्रावणी पारवे या दहावीत शिकणाऱ्या मुलीने घाटात धाडसाने बैलगाडा जुंपला. सध्या राज्यभरात दीक्षाच्या धाडसाचे कौतुक होत आहे. यामुळे आता तिची चर्चा सगळीकडे सुरु आहे. राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी हा विडिओ शेअर केला आहे.

यामध्ये ते म्हणाले की, शाब्बास गं रणरागिणी! शिवजन्मभूमीच्या मातीतील शेतकऱ्याच्या लेकीही मागे नाहीत! जी मायेने बैलपोळ्याला पुरणपोळी खाऊ घालते ती घाटात गाडा जुंपण्याची हिंमतही दाखवते! आपल्या जुन्नर तालुक्याची कन्या कु. दिक्षा विकास पारवे हिने बैलगाडा जुंपण्याची हिंमत दाखवली! दिक्षा तू महाराष्ट्रातील शूरवीर महिलांच्या परंपरेला साजेसं काम करून दाखवले आहे.

तसेच तुझ्या धाडसाचे करावे तेवढ कौतुक कमीच आहे, असे म्हणत त्यांनी तिचे कौतुक केले आहे. या विडिओमध्ये बैल उधळल्याचे लक्षात आल्यानंतरही दीक्षाने बैलाची वेसण सोडली नाही. वेसण घट्ट पकडत तिने उधळलेल्या बैलाला नियंत्रणात आणले. यावेळी बैल शांत झाले, यामुळे सध्या तिच्या या धाडसाचे कौतुक सर्वजण करीत आहेत.

अवघ्या दहावीत शिकणाऱ्या दीक्षाने बैलगाडा जुंपला. हे करीत असताना शक्तिशाली बैल अगदी आक्रमकपणे उधळला होता. मात्र ती मागे सरली नाही. यामुळे तिच्या या विडिओवर अनेकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे सध्या अनेक ठिकाणी बैलगाडा शर्यतीचे आयोजन केले जात आहे. काही दिवसांपूर्वी खासदार अमोल कोल्हे यांनी देखील यामध्ये सहभाग घेला होता. हा विडिओ देखील खूप गाजला होता.

महत्वाच्या बातम्या;
बड्या नेत्यांच्या संस्थांना 100 कोटींची व्याजमाफी, स्वाभिमानीचे कार्यकर्ते बँकेत घुसले आणि...
'असानी' चक्रीवाद वाढवणार शेतकऱ्याचे टेन्शन, राज्यात चक्रीवादळामुळे गारपीट आणि पावसाची शक्यता
दुबईला माल विकणाऱ्या शेतकऱ्यांची १ कोटींची फसवणूक, कार्यालयही गायब..

English Summary: The oxen were scattered, but she did not let go of the oxen. Published on: 19 March 2022, 04:52 IST

Like this article?

Hey! I am निंबाळकर ओंकार रमेश. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters