कोल्हापूरमध्ये दोन खिल्लारी जातीच्या बैलांनी मालकाची जीव वाचवला पण आपली जीव दिल्याची घटना समोर आली आहे. कागल तालुक्यातील वाळवे खुर्द इथं ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
दिलीप खुटाळे या शेतकऱ्यासोबत ही दुर्दैवी घटना घडली आहे. कालव्यात पडून दिलीप खुटाळे यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला आहे. ते शेतातील मशागतीची कामे आवरून बैलगाडीने घराकडे चालले होते. यावेळी कालव्याच्या काठावर आल्यावर अचानकपणे बैल घाबरल्याने दिलीप खुटाळे यांच्यासह बैलगाडी कालव्यात पडली.
बैलांना सापती असल्याने पाण्यात हालचाल करता आली नाही. त्यामुळे पाण्यात बूडून दोन्ही बैलांचा मृत्यू झाला. त्यांनी कसेबसे बाहेर येऊन इतरांना बोलावले मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. बैलांचा मृत्यू झाल्यामुळे दिलीप खुटाळे यांना घटनास्थळावरच रडू कोसळले.
फळांच्या राजाला वाचवा, बदलत्या हवामानात हापूस आंब्याचे ५० ते ८५ टक्क्यांपर्यंत उत्पादन घटले..
दरम्यान, या घटनेमुळे खुटाळे या गरीब शेतकऱ्याचे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे गावकरीही हळहळले होते. या गरिब शेतकऱ्याला शासनाने नुकसान भरपाई देवून शेतकऱ्याला हातभार लावावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
देशात साखरेचं उत्पादनात घटलं, दर वाढण्याची शक्यता..
त्यांनी जीवापाड ही बैलजोडी संभाळली होती. यामुळे त्यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची परिस्थिती देखील सर्वसामान्य आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
एक हात मदतीचा! शेतकऱ्यांना राजपत्रित अधिकारी एक दिवसाचे वेतन देणार...
दिवसा वीज देण्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय
शेतकऱ्यांनो तुमचे महत्त्वाचे हक्क तुम्हाला माहीत आहेत का? जाणून घ्या होईल फायदा
Share your comments