गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील थंडीची प्रमाण कमी झाले आहे. यामुळे तामानात काहीशी वाढ झाली आहे. पण पुढील पाच ते सहा दिवस थंडी राहणार आहे. शुक्रवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे निचांकी १२.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाने सांगितले.
अरबी समुद्राच्या पूर्वमध्य भाग व महाराष्ट्राची किनारपट्टी गुजरात ते राजस्थानच्या नैर्ऋत्य भागापर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हे क्षेत्र समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. राजस्थानच्या नैर्ऋत्य भागात चक्रीवादळासाठी पोषक वातावरण असून ते समुद्रसपाटीपासून १.५ ते २.१ किलोमीटर उंचीवर आहे. तसेच उत्तर पाकिस्तान आणि जम्मू आणि काश्मीर या परिसरातही चक्रीवादळासाठी पोषक वातावरण असल्याने उत्तरेकडून थंड वाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे.
सध्या राज्यातील अनेक भागात थंडीची ऊब कमी झाली आहे.
यामुळे किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत सात अंश सेल्सिअसपर्यंत वाढ झाली आहे. कोकणातही वाढलेली थंडी काहीशी कमी झाली आहे. त्यामुळे किमान तापमान १८ ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान नोंदविले गेले.मध्य महाराष्ट्रातही काही भागात काहीशी थंडी आहे.नगर, नाशिक, जळगाव या भागात बऱ्यापैकी थंडी आहे. त्यामुळे किमान तापमान १३ ते २० अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. मराठावाड्यातही थंडी चांगलीच कमी झाल्याने किमान तापमान वाढ झाली आहे. विदर्भातील अनेक भागात थंडीत चढउतार असल्याने किमान तापमान १२ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
हरियाणातील हिसार येथे उणे १.२ अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. उद्या पासून पुढील दोन ते तीन दिवस उत्तरेकडील काही राज्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचा परिणामही राज्यातील वातावरणावर होणार आहे. आज राजधानी दिल्लीमध्ये पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे दिल्लीतील पारा १.१ अंशांवर गेला आहे.
आगामी दोन दिवस दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, दिल्लीत २ जानेवारी ते ५ जानेवारी या कालावधीत तुरळक ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल तसेच दिल्लीसह राजधानी क्षेत्र, उत्तर प्रदेश, हरियाणाच्या काही भागात पुढील ४ ते ५ दिवस नियमित अंतराने पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
Share your comments