1. बातम्या

परतीची वाट अजून दूर ; सप्टेंबरमध्ये परतीला निघणारा मॉन्सून थांबणार ऑक्टोबरपर्यंत

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


राज्यातील बहुतांशी भागात पावसाचे प्रमाण कमी झाले. पण राज्यात पावसाने कहर माजवला असून शेतांमधील पिकांची मोठे नुकसान झाले आहे. मराठावाड्यात दमदार पाऊस झाल्याने तेथील शेतांमध्ये गुघड्याला पाणी लागेत इतके पाणी तुंबले आहे. दरम्यान राज्यात होणार होणारा पाऊस हा अजून मॉन्सूनचा आहे. मॉन्सूनने अजून परतीची वाट पकडलेली नाही. मॉन्सून आपला परतीचा प्रवास हा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरावाड्यात सुरू करेल. सध्या अनेक भागात पाऊस सुरू असल्याने यावर्षी परतीचा प्रवास लांबला आहे.   सर्वसाधरणपणे मॉन्सूनचा परतीचा प्रवास एक सप्टेंबरला सुरू होत असतो.

मात्र राजस्थानमध्ये परतीच्या मॉन्सूनसाठी ३० सप्टेंबर दरम्यान पोषक वातावरण तयार होईल, असे संकेत भारतीय हवामान विभागाने दिले आहेत.  दरम्यान मागील पाच वर्षांपासून परतीच्या मॉन्सूनचे वेळापत्रक बदलले आहे. मॉन्सूनची पश्चिम राजस्थानमधून माघारी फिरण्याची सर्वसाधरण तारीख एक सप्टेंबर आहे. त्यानंतर १५ ऑक्टोबरच्या आत मॉन्सून देशाच्या सर्व भागातून बाहेर पडतो. गेल्यावर्षी मॉन्सूनचा परतीचा प्रवास ९ ऑक्टोबरला सुरू झाला होता. या वर्षी देखील आपला प्रवास लांबवला आहे.  जूनमध्ये जोरदार बरसल्यानंतर मॉन्सूनने जुलैमध्ये विश्रांती घेतली. पण ऑगस्टमध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात दमदार हजेरील लावली. त्यानंतर सप्टेंबरमध्येही  पाऊस सुरूच आहे. काही जिल्हे सोडले तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या चारही विभागात सरासरी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला गेला. ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवाड्यानंतर मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.  हा परतीचा प्रवास राजस्थानच्या पश्चिम भागापासून सुरू होईल, त्यानंतर उत्तर भारत, गुजरात, पश्चिम मध्य प्रदेशामधून  मॉन्सून परतलेला असेल.  

दरम्यान राजस्थानच्या पश्चिम भागात अजून  चक्राकार वाऱ्याची स्थिती आहे. तसेच दक्षिण उत्तर प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात कमी दाबाचे क्षेत्र असून चक्रवातामध्ये रुपांतर होण्याची स्थिती आहे. याशिवाय मॉन्सूनचा आसही बिकानेर, ग्वाल्हेर, उत्तर प्रदेश, गया ते मनिपूर दक्षिण आसामपर्यंत आहे. अफगाणिस्तानच्या परिसरातही चक्रकार वाऱ्याची स्थिती आहे. त्यामुळे उत्तर भारतात अनेक ठिकाणी कमी अधिक स्वरुपात पाऊस पडत आहे. दरम्यान परतीच्या प्रवासावेळी वाऱ्याची दिशा बदलून ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहण्यास सुरुवात होईल. राजस्थान, मध्य प्रदेश, हरियाणा या भागातील पाऊस पडण्याचे प्रमाण कमी झालेले दोन ते चार दिवसात पाऊस थांबेल. त्याचवेळी उत्तरेकडील हवेचे दाब वाढलेले असतील. तर दक्षिणेकडील हवेचे दाब कमी होण्यास  सुरुवात होईल.  ईशान्येकडील हवेचे दाब जास्त असल्याने वारे ईशान्य कडून बाष्प घेऊन दक्षिणेकडे येतील.

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters