अशीच एक यशस्वी कथा ही प्रद्युम्न यांचे आहे. प्रदुम्न हे आसाम मधील एका वीटभट्टीवर काम करत होते. ते कायम मजुरी करून आपल्या उदरनिर्वाहासाठी काम करीत होते. परंतु त्यांनीही आपल्या स्वतःच्या घरामध्ये राहून मशरूमचे उत्पादन घेणे सुरू केले आहे. ह्या शेतीमधून ते सहज देणे महिन्याला पंधरा हजार रुपये कमवत आहेत.ही सगळी कल्पनाही डॉक्टर राजेंद्र प्रसाद केन्द्रीय कृषि विश्वविद्यालय मधील सीनियर वैज्ञानिक डॉक्टर दयाराम यांची आहे. डॉक्टर दयाराम यांनी टीव्ही नाईन हिंदी ला सांगितले की मजूर वर्षभर आपल्या घरापासून दूर राहून आत्ता उदरनिर्वाह पुरतेच कमवू शकत होते.
त्यातच कोरोना सारखा साथीच्या आजाराने त्यांना आणखीनच त्रस्त करून सोडले. त्यासाठी त्यांना घरी राहून कमवायचे साधन कसे उपलब्ध केले जाईल यासाठी विचार करून मशरूमची शेती हा एक पर्याय निवडून काम करण्यास सुरुवात केली. जेव्हा त्यांनी यावर काम सुरू केले तर काही लोकांनी त्यांची मजाक केली.
परंतु नंतर मशरूम चा शेती करण्यासाठी पायलट प्रोजेक्ट च्या रुपात भरपूर प्रमाणात मजूर तयार झाले व त्यांचे परिणामही खूप छान आले. दीपक कुमार युनिव्हर्सिटी यांच्याकडून कॉर्डिनेटर च्या रूपात या प्रवासी मजुर या प्रोजेक्ट सोबत जोडले गेले आहेत. जवळ जवळ एका वर्षात 20 कुटुंब या प्रोजेक्ट सोबत जोडले गेले होते. आत जवळजवळ 100 पेक्षा जास्त कुटुंब या योजना पर्यंत पोहोचले आहेत. या प्रोजेक्टमुळे मजुरांना गावातल्या गावात मासिक 7 ते 10 हजार रुपयांची कमाई होऊ लागली आहे. अगोदर हा प्रोजेक्ट सुरू करण्यासाठी युनिव्हर्सिट कडून फंड मिळाला परंतु आता स्वतः हे शेतकरी मशरूमच्या बियाण्यापासून तर लागणाऱ्या बॅगा पर्यंतचा सगळा खर्च स्वतः करत आहे.
मशरूम ची शेती करताना हे सगळे शेतकरी आपल्या झोपडीमध्ये रॅक वर दोन दोन बॅग टांगून देतात. मशरूम निघाल्यानंतर ते बाजारामध्ये नेऊन त्याची विक्री केली जाते. आता बरेचसे मजूर हे आपल्या स्वतःच्या घरामध्ये रॅक च्या साह्याने मशरूमची शेती करीत आहेत. मशरूम मुळे या मजुरांना चांगल्या प्रकारची ओळख मिळाली आहे.
येथे जवळ जवळ तीन प्रकारची मशरूमचे उत्पादन घेतले जाते. मशरूम साठी जवळजवळ 25 डिग्री सेल्सियस तापमान आवश्यक असते. त्यासाठीही मजूर टेंपरेचर मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा चांगल्या प्रकारची तयारी करीत आहेत.
सौजन्य -tv9 भारत वर्ष
Share your comments