मार्च महिन्यात राज्यामध्ये विविध भागात वाढीव तापमान पाहायला भेटले आहे. दिवसेंदिवस तापमानाचा पारा हा वाढतच चालला आहे जे की एप्रिल महिना सुरू होताच अनेक भागात तापमानाने उच्च पारा गाठलेला आहे. हे वाढते तापमान बघता वातावरणात अवधी गरमी पसरलेली आहे की लोक या गरमीने हैराण झालेले आहेत. परंतु आता हवामान विभागाने पुढील चार दिवस अवकाळी पाऊस पडणार असल्याची दाट शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर हवामान खात्याने राज्यातील १० जिल्ह्यांना यलो अलर्ट देखील दिलेला आहे. पुढील ३ दिवसामध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागामध्ये पाऊसासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. दक्षिण मध्ये महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तसेच पाऊसासह विजांचा कडकडाट सुद्धा होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिलेली आहे.
या 10 जिल्ह्यांना यल्लो अलर्ट :-
महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या १० जिल्ह्यांना हवामान खात्याने यलो अलर्ट दिलेला आहे. जे की या १० जिल्ह्यात पावसाच्या सरी तरी कोसळणार आहेत सोबतच विजांचा कडकडाट सुद्धा होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलेली आहे.आयएमडीने म्हटले आहे की संपूर्ण देशात एप्रिलमध्ये पाऊस सामान्य असेल.
कोकण विभागात ५ एप्रिल रोजी काही भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तर काही भागात विजांचा कडकडाटसह पाऊसाची हजेरी लागणार असल्याचे सांगितले आहे. तसेच मध्य महाराष्ट्र राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. दक्षिण तसेच मध्य महाराष्ट्र राज्यात तुरळक ठिकाणी पाऊसासह विजांचा कडकडाट देखील होणार आहे. मराठवाडा व विदर्भात देखील हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
६ व ७ एप्रिल :-
६ आणि ७ तारखेला सुद्धा महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलढाणा, अकोला, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमधील काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जे की विजांच्या कडकडाटसह पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. या १० जिल्ह्यांना हवामान खात्याने येल्लो अलर्ट देखील दिलेला आहे.
Share your comments