परतीच्या पावसाला देशातून माघार घेण्यासाठी पोषक स्थिती झाल्याने नैऋत्य संपूर्ण देशातून बुधवारी माघार घेतली.महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून मॉन्सूनचे वारे परतले असून दक्षिण भारतातील राज्यांमध्ये ईशान्य मोसमी वारे सक्रिय झाल्याची माहिती हवामान विभागाच्या सुत्रांनी दिली आहे. पावसाने माघार घेतल्यानंतर राज्यात उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे उकाडा वाढण्यास सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रातही आकाश निरभ्र राहत असून उन्हाचा पारा वाढत आहे.
किमान तापमानात चढ- उतार सुरु असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. सकाळपासून उन्हाचा चटका वाढत असल्याने कमाल तापमानाचा पारा हळूहळू वाढत आहे. दुपारी उन्हाचा पारा वाढल्याने कमाल तापमानात वाढ झाली आहे. पुण्यातही कमाल तापमान ३० अंश सेल्सिअसच्या वर गेले असून किमान तापमान सरासरीच्या तुलनेत एक अंश सेल्सिअसने वाढले आहे, तर काही ठिकाणी कमाल व किमान तापमानात घट झाली आहे.बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जळगाव येथे ३५.४ अंश सेल्सिअस एवढ्या कमाल तापमानाची नोंद झाली आहे.
तर मध्य महाराष्ट्र व कोकणच्या दक्षिण भागात काही ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे हवेत गारवा तयार होत आहे.परतीच्या पावसाने राज्यातून माघार घेतली असली तरी काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडत आहे. दरम्यान यंदा मॉन्सून साधारणपणे एक जून रोजी केरळात दाखल झाला होता.त्यानंतर ११ जून रोजी मॉन्सून दाखल होत १४ जडून रोजी संपूर्ण महाराष्ट्र व्यापला होता. त्यानंतर वेगाने उत्तरेकडे सरकून संभाव्य वेळेच्या १२ दिवस अगोदर २६ जून रोजी मॉन्सून वाऱ्यांनी संपूर्ण देश व्यापला.
Share your comments