विदर्भातील काही भागात उन्हाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. कमाल तापमानाचा पारा अनेक भागांत वाढू लागला आहे. येत्या काळात विदर्भासह इतर भागातही उन्हाचा चटका आणखी वाढणार आहे. मंगळवारी सकाळी चोवीस तासांत ब्रह्मपुरी देशातील उच्चांकी तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
राज्यात कोरडे हवामान असल्याने सूर्यकिरणचे थेट जमिनीवर पडत आहेत. उन्हाचा चटका वाढत असल्याने सकाळपासून झळा तीव्र होत आहेत. दहा वाजल्यापासून उन्हाचा पारा वाढत आहे. दरम्यान विदर्भाच्या काही भागात काही प्रमाणात उष्णतेची लाट आली आहे. त्यामुळे राज्यातील जळगाव, मालेगाव, सोलापूर, परभणी, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा, या ठिकाणी कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वर गेले आहे. इतर भागातही तापमानत काही अंशी किंचित वाढ झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून दक्षिण महाराष्ट्र आणि परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ९०० मीटर उंचीवर आहे. तसेच बंगालचा उपसागराचा आग्रेय भागात चक्रीय वाऱ्याची स्थिती असून , ती समुद्रसपाटीपासून साडेचार किलोमीटर उंचीवर आहे. तर बंगालचा उपसागर आणि दक्षिण अंदमान समुद्र या भागात आज कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून ते अंदमानच्या उत्तर भागात सरकेल. हिंद महासागर आणि अरबी समुद्राच्या आग्नेय भागात त्यांचे तीव्र कमी दाबाच्या क्षेत्र असून त्याचे चक्रीय वाऱ्यांमध्ये रुपांतर होण्याची शक्यता आहे. यामुळे वातावरण वेगाने बदल होत असल्याने काही ठिकाणी उन्हाचा पारा वाढत आहे.
दरम्यान एप्रिल-मे महिन्यात उष्ण लहरींचं प्रमाण वाढतं राहण्याची सर्वाधिक शक्यता नासानं नोंदवली आहे. हवामान खात्यानुसार महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, मध्य भारत, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेशात सरासरीपेक्षा अधिक तापमानाची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. ही वाढ 0.5 अंशांची असेल. तर जागतिक हवामान जोखीम निर्देशांकानुसार भारत हवामानाच्या संदर्भात धोक्याच्या सातव्या स्थानावर आहे. वाढत्या उष्णलहरींचा पावसालाही फटका बसणार आहे.
दरम्यान उष्णतेमध्ये काही काळजी घेण्याची आवश्यकता आहे.
अशी घ्या काळजी
- उष्णता वाढत असल्याने अधिक प्रमाणात पाणी प्या. तहान लागली नसली तरी थोडे-थोडे पाणी पीत राहा.
- आपले शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी घरगुती तयार केलेली पेय लिंबू पाणी, लस्सी, ताक, उसाचा रस, ओआरएस घ्यावे.
- हलक्या रंगांचे, ढिल्ले आणि कॉटनचे कपडे वापरा.
-
दुपारच्या वेळेत बाहेर पडू नका. उन्हात डोके झाका, तोंडाला रूमाल लावा आणि छत्रीचा वापर करा.
- कोरोनामुळे सामाजिक अंतर पाळा. वारंवार हात स्वच्छ धुवा.
- घर स्वच्छ ठेवा. पाण्याचा अपव्यय टाळा. जेणेकरुन येत्या काळात पाण्याची कमतरता भासणार नाही.
Share your comments