सांगली जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या आर्थिक कोंडीत सापडलेला आहे. नुकतेच जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याचे पैसे आले आहेत. मात्र असे असले तरी, नुकसान पर्वताएवढे आणि भरपाई राई एवढी असल्याने डाळिंब उत्पादक शेतकरी फारशे समाधानी नसल्याचे बघायला मिळत आहे. डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना यामुळे धड रडताही येत नाही आणि धड हसता देखील येत नाही.
मुर्ग बहारात जिल्ह्यातील अनेक डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी विमा काढला होता. मुर्ग बहारातील डाळिंबावर अवकाळी पावसाचे सावट असल्याने डाळींबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई म्हणून विमा कंपनीने अठरा हजार रुपये प्रतिहेक्टर अशी तुटपुंजी भरपाई मंजूर केली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी नाखूश असल्याचे चित्र जिल्ह्यात बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या मते, डाळिंबाचे झालेले नुकसान बघता दिली जाणारी भरपाई खूपच तोकडी आहे.
जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात दहा हजार हेक्टर क्षेत्रात डाळिंबाचा बहर पकडलेला होता. एवढ्या मोठ्या क्षेत्रातील डाळिंबाची लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी पिक विमा उतरवला होता. जुलै 2021 ते हे 2022 च्या मध्य जानेवारीपर्यंत या विमाचा कालावधी होता. विम्यासाठी हेक्टरी एक लाख 21 हजार एवढी रक्कम विमा कंपन्यांनी वसूल केली आहे, या एवढ्या मोठ्या रकमेपैकी95 टक्के रक्कम शासनाने भरली असून पाच टक्के रक्कम डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी भरलेली आहे.
विमा कंपनीने मुर्ग बहरात आलेल्या अवकाळी पावसामुळे झालेलं नुकसान व बहाराच्या सुरुवातीला अल्प पाऊस पडलेला असल्याने डाळिंबाचे झालेले नुकसान विचारात घेता डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना भरपाईसाठी पात्र असल्याचे जाहीर केले. तज्ञांनी या परिसरातील शेतकऱ्यांना हेक्टरी 36000 दिल गेले पाहिजेत असे मत व्यक्त केले होते. मात्र असे असले तरी विमा कंपनीने मात्र अठरा हजार रुपये हेक्टरी एवढीच नुकसान भरपाई डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकरी मोठे नाराज आहेत. विमा कंपन्यांनी दिलेली नुकसान भरपाई ही केवळ एक दिखावा असल्याचे शेतकऱ्यांद्वारे सांगितले जातं आहे.
दिलेल्या नुकसान भरपाईमुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नसल्याचे सांगितले जात आहे. एकंदरीत विमा कंपन्यांनी दिलेली नुकसान भरपाई शेतकऱ्यांना फायद्याची नसल्याची सांगितले जात आहे, ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जगु ही देणार नाही आणि मरू ही देणार नाही अशी असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. आधी निसर्गाच्या अवकृपेमुळे डाळिंब उत्पादक शेतकरी हतबल झाला होता आणि आता सुलतानी दडपशाहीचा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे.
Share your comments