पीएम किसान सम्मान निधि योजना ही केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. आपल्याला माहित आहेच की या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन टप्प्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करण्यात येतात.
परंतु ही रक्कम कोणत्या पद्धतीने दिली जाते? त्याची संपूर्ण प्रक्रिया नेमकी कशी असते? हे प्रश्न अनेकांना पडत असतील. तर आपण या लेखात याबाबत जाणून घेऊ.
अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मिळतो लाभ
पी एम किसान च्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार,देशातील घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकार लाभार्थींचा डेटा हा पी एम किसानच्या पोर्टल वर अपलोड करतात. या योजनेसाठी असलेले पात्र शेतकरी महसूल अधिकारी किंवा इतर नियुक्त अधिकारी किंवा एजन्सी किंवा तलाठी यांच्याकडे यासाठी अर्ज करू शकतात.
तालुका आणि जिल्हास्तरावर संबंधित केंद्रशासित प्रदेश अथवा राज्य सरकार द्वारे नियुक्त केलेली नोडल अधिकारी डेटा फॉरवर्ड करतात आणि त्यांना स्टेट नोडल ऑफिसर त्यांच्याकडे ट्रान्सफर करतात. त्यानंतर राज्याचे नोडल अधिकारी प्राप्त डेटाचे प्रमाणीकरण करतात आणि पोर्टलवर वेळोवेळी बॅचमध्ये अपलोड करतात. राज्य नोडल ऑफिसर द्वारे आपलोड केलेला लाभार्थी डेटा अनेक टप्प्यातून जातो. जेथे तो राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र, सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली आणि बँकांद्वारे सत्यापित केला जातो. सत्यापित डेटा वर आधारित SNO बॅचमध्ये लाभार्थ्यांच्या रिक्वेस्ट फॉर ट्रान्सफरवर सही करतात.त्यानंतर त्या निधीची रक्कम बॅचसाठी ट्रान्सफर केली जाते व पोर्टलवर अपडेट केली जाते.
तसेच आरएफटीच्या आधारावर पीएफएमएस एफटीओ म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर जारीकरते. एफटीओ च्या आधारावर कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग FTO मध्ये लिहिलेल्या रकमेसाठी मंजुरी आदेश जारी करतात.त्यानंतर ही रक्कम लाभार्थ्याच्या बँक खात्यात ट्रान्सफर केले जाते. यामध्ये संपूर्ण प्रक्रियेतील बँकिंग व्यवहाराचे निरीक्षण आणि व्यवस्थापन आहे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया द्वारे केले जाते.(स्त्रोत-पोलीसनामा)
Share your comments